Live Updates : वाशिम जिल्ह्यात महाविद्यालय आणि शाळा बंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | January 07, 2022, 23:39 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  22:15 (IST)

  राज्यात कोरोनाचा वाढता धोका, प्रशासन नवे निर्बंध लागू करण्याच्या तयारीत, राज्यातील 6 विभागीय आयुक्तांसोबत मुख्य सचिवांनी घेतली बैठक, यानंतर विभागीय आयुक्तांनी सर्व विभाग जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक, या सर्व बैठकांचा अहवाल होणार मुख्यमंत्र्यांना सादर, नव्या निर्बंधांवर त्वरित निर्णय होण्याची शक्यता, राज्यात वीकेंडसाठी लागू होणार नवी नियमावली तर हॉटेल्स, व्यवसायाबाबत होऊ शकतात बदल, बाजारपेठेतील दुकानं अल्टरनेट डे सुरू ठेवण्याबाबतही प्रस्ताव

  21:23 (IST)

  राज्यात दिवसभरात 40 हजार 925 नवीन रुग्ण
  राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 20 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात दिवसभरात 14,256 रुग्णांना डिस्चार्ज

  20:51 (IST)

  नाशिक - जमिनीच्या वादातून सिन्नर फाटा परिसरात 2 गटात तुफान हाणामारी, वयोवृद्ध इसमासह महिलांना बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ प्रत्यक्षदर्शींच्या कॅमेऱ्यात कैद; लाकडी दंडुके, हॉकी स्टीकनं महिलांनाही मारहाण; नाशिक रोड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल

  20:5 (IST)

  नाशिक - 15 दिवसांत 3 तोतया लष्करी अधिकारी अटकेत
  देवळालीच्या लष्करी भागात फिरत असताना केली अटक

  20:3 (IST)

  लालपरी रस्त्यावर, 250 डेपोतील 196 डेपो सुरू
  एसटी महामंडळाची 'न्यूज18 लोकमत'ला माहिती
  24 हजार 940 एसटी कर्मचारी कामावर हजर
  92 हजारांमधील 2100 एसटी कर्मचारी बडतर्फ
  सध्या 89 हजार एसटी कर्मचारी पटावर
  राज्यात दिवसभरात लालपरीच्या 5 हजार फेऱ्या

  19:31 (IST)

  1 हजारात बनावट लसीकरण सर्टिफिकेट
  सायबर कॅफेचालक पोलिसांच्या ताब्यात
  धारावी पोलिसांनी रचला होता सापळा

  19:27 (IST)

  मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी
  मुंबईत दिवसभरात 20 हजार 971 नवे रुग्ण
  मुंबईत दिवसभरात 8 हजार 490 कोरोनामुक्त
  मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 6 रुग्णांचा मृत्यू

  18:57 (IST)

  धुळे - जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपलं, शिरपूर तालुक्यात गारपीट, पिकांचं मोठं नुकसान; गहू, हरभरा, कांदा जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल; साक्री तालुक्यातही फळबागांसह रब्बी पिकांचं नुकसान

  18:35 (IST)

  'मागील 35 वर्षांचे इन्कम टॅक्सचं संकट दूर केलं'
  याबाबत अमित शाहांना भेटलो होतो - फडणवीस
  साखर कारखानदारीला फायदा होणार - फडणवीस

  18:26 (IST)

  नाशिक - कोरोना रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ
  नवीन 837 रुग्ण तर 138 रुग्ण कोरोनामुक्त
  नाशिक जिल्ह्यात आज एकाही बळीची नोंद नाही

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स