नागपूर - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दरानं वीजपुरवठा, पालकमंत्री नितीन राऊतांची गणेशोत्सव पर्वात घोषणा, हा नियम राज्यभरातील सर्व गणेश मंडळांना लागू होणार, ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या कार्यालयाची माहिती
21:23 (IST)
छत्तीसगड - 5 माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण
दंतेवाडासह दंडकारण्यात 5 माओवादी होते सक्रिय
21:23 (IST)
भारत विरुद्ध इंग्लंड चौथी कसोटी
भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
इंग्लंडचा 157 धावांनी केला पराभव
भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी
20:52 (IST)
नवी मुंबईत कोरोना मृत्यूचा आकडा शून्यावर
कोरोना काळात पहिल्यांदाच मृत्यूची नोंद नाही
नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्याही 51 वर
20:40 (IST)
मुंबई - गॅसगळतीमुळे आग लागल्याचं प्रकरण
आगीत जखमी झालेल्या एकूण 5 जणांचा मृत्यू
ज्यात 8 वर्षांचा लहानग्या मुलाचाही समावेश
धारावीच्या शाहूनगरमध्ये घडली होती दुर्घटना
20:21 (IST)
अनिल देशमुख सीबीआय रिपोर्ट लीक प्रकरण
वकील आनंद डागा, CBI उपनिरीक्षक अभिषेक तिवारी
कोठडीत वाढीची मागणी करणारी CBI याचिका
दिल्लीच्या राऊंज एव्हिन्यू कोर्टात झाली सुनावणी
दोघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सीबीआयनं पोलीस कोठडीची केली होती मागणी
डागा, तिवारी यांच्या अर्जावर 8 तारखेला सुनावणी
20:0 (IST)
'इस्लाम परकीय आक्रमणामुळे भारतात आला'
'हा इतिहास आणि तो तसाच सांगितला गेला पाहिजे'
'आततायी गोष्टी सुशिक्षितांनी समजावून द्यायला हव्यात'
'कट्टरपंथींचा विरोध करण्यासाठी आताच जागृत व्हावं'
'या जागृतीसाठी जेवढा वेळ लावू तेवढं समाजाचं नुकसान होईल'
सरसंघचालक मोहन भागवतांचं मुंबईतील कार्यक्रमात वक्तव्य
19:51 (IST)
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर आता सीसीटीव्हीची नजर, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मान्यता; कांदळवनाचं जतन करा, कांदळवन वृक्षलागवड करा - मुख्यमंत्री
19:49 (IST)
'भारतात राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एक आहेत'
मोहन भागवत यांचं मुंबईतील कार्यक्रमात वक्तव्य
'देश पुढे जायचा असेल तर सर्वांना सोबत जावं लागेल'
'आमच्यासाठी हिंदू हा शब्द मातृभूमी, गौरवशाली परंपरा'
आणि आपले पूर्वज यांचा प्रतिशब्द आहे - मोहन भागवत
...तर देशाच्या वर्चस्वाचा विचार करावा लागेल - भागवत
आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो - मोहन भागवत
इथं दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही - भागवत
19:40 (IST)
पूरग्रस्त शेतकरी, बाधितांसाठी मोठी बातमी
पुन्हा उभं करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न - मुख्यमंत्री
पुराबाबत कायमस्वरूपी उपाययोजनांचेही प्रयत्न
स्वाभिमानीच्या शेतकरी शिष्टमंडळासोबत झाली बैठक
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स