LIVE: आशिष शेलार यांनी घेतली अमित शहांची दिल्लीत भेट

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 06, 2021, 20:02 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:16 (IST)

  पणजी - तब्बल 4 महिन्यांनंतर गोव्यातून परदेश प्रयाण, शारजाहला पहिल्या विमानाचं आज उड्डाण, 30 प्रवाशांना घेऊन आज पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय उड्डाण, गेल्या 4 महिन्यांपासून गोव्यातल्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाण नाहीच, प्रवाशांच्या तपासणीनंतर आज झालं पहिलं आंतरराष्ट्रीय उड्डाण, कोरोनाची सर्व नियमावली पाळत 4 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाण

  20:13 (IST)

  नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव
  एकसाथ 30 बाधित, 155 सॅम्पल्स पाठवलेले तपासणीला
  नांदगाव, सिन्नर, येवला, कळवणमधील गावात 28 रुग्ण
  नाशिक शहरात डेल्टा व्हेरियंटचे दोन रुग्ण
  'डेल्टा'चे सर्व रुग्ण आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली

  19:38 (IST)

  कोल्हापूर - मसाई पठारवरून गाडी दरीत कोसळली, दोघांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी, मसाई पठारावर फिरण्यासाठी गेल्यानंतर घडला अपघात

  19:8 (IST)

  मला लोकांचा जीव महत्वाचा आहे - मुख्यमंत्री
  उद्धव ठाकरेंनी हॉटेल मालकांना ठणकावलं
  'आठवडाभरात परिस्थिती पाहून निर्णय घेईन'
  मुख्यमंत्र्यांकडून हॉटेल मालकांना आश्वासन
  हॉटेल मालक संघटनांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
  लॉकडाऊनच्या निर्बंधांवर व्यक्त केली होती नाराजी
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्याच्या निर्बंधांवर ठाम

  18:36 (IST)

  आशिष शेलारांनी घेतली अमित शाहांची भेट
  सहकार खातं मिळाल्यानंतर शेलारांनी घेतली भेट

  18:36 (IST)

  'पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली बैठक'
  'आघाडी कोणाशी करावी का याबाबत चर्चा नाही'
  काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांची माहिती
  'मुंबईच्या शिवाजी पार्कवर 28 डिसेंबरला मेळावा'
  'सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा मेळावा'
  'काँग्रेस स्थापना दिवसाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम'
  काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांची माहिती
  'खेलरत्न'चं नाव बदलणं हे राजकीय हेतूनं प्रेरित
  'याआधी ध्यानचंद यांच्या नावानं राष्ट्रीय पुरस्कार आहे'

  18:20 (IST)

  शरद पवार कर्नाटक दौऱ्यावर, मुख्यमंत्री बोमईंची घेतली भेट
  जयंत पाटलांनीही घेतली बोमईंची भेट
  जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत बैठक 
  13 ते 20 ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस?
  आयएमडीकडून मुसळधार पावसाची शक्यता
  संभाव्य पूरस्थितीबाबत बैठकीत चर्चा

  17:14 (IST)

  '102 व्या घटनादुरुस्तीतील नवीन बदल ऐतिहासिक'
  पंतप्रधान मोदींचं मन:पूर्वक अभिनंदन - मेटे
  प्रयत्न करणाऱ्या फडणवीसांचेही आभार - मेटे
  'समाज मागास आहे, सिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू करा'
  'चव्हाण आधी अधिकार नाही म्हणून ओरडत होते'
  'आता म्हणतायत अधिकार देऊन काय उपयोग?'
  राज्य मागासवर्ग आयोगानं अहवाल द्यावा - मेटे
  'केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे अहवाल द्यावा'
  सुप्रीम कोर्टाच्या प्रक्रियेप्रमाणेच जायला हवं - मेटे
  'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीनं बैठक घ्यावी'
  'अशोक चव्हाणांकडून ही जबाबदारी काढून घ्यावी'
  बैठक न लावल्यास 13 तारखेला आंदोलन - मेटे
  मुंबईत राज्यव्यापी बैठक घेणार - विनायक मेटे

  17:8 (IST)

  102 व्या घटनादुरुस्तीतील नवीन बदल ऐतिहासिक आहे, पंतप्रधान मोदींचं मन:पूर्वक अभिनंदन, हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचेही आभार - विनायक मेटे

  17:3 (IST)

  महाराष्ट्रातील शाळांसंदर्भात मोठी बातमी
  शाळा सुरू करण्यासाठी विचार सुरू - सूत्र
  शालेय शिक्षण विभाग घेणार महत्वाची बैठक
  मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत चर्चेनंतर निर्णय होणार

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स