Live Updates: पुण्यात कोरोनामुळे आज कुणाचाही मृत्यू नाही, दिवसभरात 94 रुग्णांची वाढ

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 04, 2021, 19:08 IST |
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:58 (IST)

  माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची चौकशी संपली
  देशमुखांची ईडीकडून पावणेनऊ तास चौकशी
  देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंगही होते उपस्थित
  अनिल देशमुखांच्या मुलाचीही होणार चौकशी
  काही दिवसांत चौकशीला हजर राहावं लागणार

  20:47 (IST)
  नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, नागपुरात दिवसभरात एकही नवा कोरोना रुग्ण नाही, कोरोनाचा एकही बळी नाही
   
  18:17 (IST)

  मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताच्या ट्रेडिंगला सुरुवात
  अभिनेत्री भाग्यश्रीच्या उपस्थितीत मुहूर्ताचं ट्रेडिंग
  6.15 ते 7.15 - शेअर्सची खरेदी-विक्री करता येणार
  गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्वाचा
  लक्ष्मीपूजनावेळी व्यापाऱ्यांकडून चोपडीपूजन
  देशभरात दिव्यांच्या साक्षीनं घरोघरी लक्ष्मीपूजन
  सुख-समृद्धी, भरभराटीसाठी लक्ष्मीची आराधना

  17:19 (IST)

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवाळीमध्ये पावसाचं धुमशान
  लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गडगडाटासह पाऊस
  दुकानदारांसह नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण

  17:19 (IST)

  अनिल देशमुखांची गेल्या 8 तासांपासून चौकशी सुरू
  देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंग ईडी कार्यालयात
  जबाब नोंदवण्याआधी देशमुखांची वैद्यकीय चाचणी
  तक्रार करणारा फरार आहे - छगन भुजबळ
  'देशमुखांना त्रास का दिला जातोय हे कळत नाही'

  17:11 (IST)

  राज ठाकरेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
  'एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करू नये'
  एसटी सरकारमध्ये विलीन करा, कर्मचाऱ्यांचं आंदोलन
  संपावरील कर्मचाऱ्यांना सरकारनं बजावलीय नोटीस
  'कर्मचारी जगला तर एसटी जगेल याचं भान ठेवाल'
  'कारवाई न करण्याचे परिवहनमंत्र्यांना आदेश द्याल'
  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

  14:28 (IST)

  अनिल देशमुखांना मेडिकल करण्यासाठी रूग्णालयात नेण्यात आलं
  मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कोठडीत
  6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली. 

  14:28 (IST)

  कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मी अनिल देशमुखांचा जबाब नोंदवला जात असताना उपस्थित राहाणार आहे. त्यासाठी आलो आहे
  अनिल देशमुख यांचे वकिल इंद्रपाल सिंग यांची माहिती
  आज साधारण चार पाच तास जबाब नोंदवला जाईल. त्यासाठी उपस्थित राहाणार आहे- अनिल देशमुख यांचे वकिल
  कोर्टाने त्यांना मेडिकल फॅसिलीटी आणि घरचे जेवण देण्यास परवानगी दिली- अनिल देशमुख यांचे वकिल

  12:33 (IST)

  'अनिल देशमुखांचा जबाब नोंदवताना उपस्थित राहणार'
  आज 4-5 तास जबाब नोंदवला जाईल - इंद्रपाल सिंग
  'वैद्यकीय सुविधा, घरच्या जेवणास कोर्टाची परवानगी'
  अनिल देशमुखांचे वकील इंद्रपाल सिंग यांची माहिती

  10:20 (IST)

  'एक निवडणूक जिंकली म्हणून पंतप्रधानपदाचं स्वप्न'
  भाजपच्या आशिष शेलारांचं शिवसेनेला प्रत्युत्तर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स