LIVE Updates: सिद्धार्थ शुक्लावर उद्या होणार अंत्यसंस्कार; चाहते गदगदले

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

  • News18 Lokmat
  • | September 02, 2021, 22:32 IST |
    LAST UPDATED 2 YEARS AGO

    हाइलाइट्स

    22:3 (IST)

    एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; मुंबई महानगर क्षेत्रातील एमपीएससी परीक्षार्थींना फक्त 4 सप्टेंबरला लोकल प्रवासाची मुभा मात्र रेल्वे प्रवास करण्यासाठी परीक्षार्थींना हॉल तिकीट आवश्यक 

    20:30 (IST)

    मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या बैठक
    मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार बैठक
    मराठा आरक्षण सर्वपक्षीय बैठक उद्या दुपारी 4 वा.
    ओबीसी आरक्षण बैठक उद्या संध्याकाळी 6 वाजता
    दोन्ही बैठकांचं सह्याद्री अतिथीगृहावर आयोजन 

    20:23 (IST)

    वसई-भुईगाव समुद्रात आढळली संशयास्पद बोट
    तटरक्षक दल आणि पोलिसांकडून बोटीची पाहणी
    सर्व सुरक्षा यंत्रणांना दिले सतर्कतेचे आदेश 

    18:26 (IST)

    खासदार संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट
    सर्वपक्षीय शिष्टमंडळही होतं संभाजीराजेंसोबत
    मराठा आरक्षण प्रश्नावर राष्ट्रपतींशी केली चर्चा
    राष्ट्रपतींसोबत सविस्तरपणे चर्चा - संभाजीराजे
    'मराठा समाजाचे प्रश्न राष्ट्रपतींसमोर मांडले'
    'राज्याला दिलेले आरक्षणाचे अधिकार बिनकामाचे'
    'सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं आवश्यक'
    'अनेक राज्यांमध्ये 50 टक्क्यांच्यावर आरक्षण'
    'आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवून द्या'
    मराठा समाजाला न्याय मिळावा - संभाजीराजे 

    17:42 (IST)

    कोकणात नारायण राणेंना शिवसेनेचा धक्का
    देवगडचे 2 नगरसेवक शिवसेनेत करणार प्रवेश
    'वर्षा'वर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
    नगरसेविका हर्षदा ठाकूर शिवसेनेत करणार प्रवेश
    नगरसेवक विकास कोंयडे शिवसेनेत करणार प्रवेश
    राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला शिवसेनेचं उत्तर 

    17:9 (IST)

    श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना मुख्य मंदिरातच
    कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी निर्णय
    पारंपरिक कोतवाल चावडीत मांडव उभारणार नाही
    10 दिवस विश्वस्त, कार्यकर्ते मंदिरात जाणार नाहीत
    मंदिरात प्रवेश नाही, बाहेरूनच दर्शन घेता येणार
    ऑगमेंटेड रियालिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर
    भाविकांना घरबसल्या मिळणार गणपतीचं दर्शन
    हार, फुले, पेढे, नारळ स्वीकारले जाणार नाहीत
    यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचं 129 वर्ष

    16:44 (IST)

    'न्यूज18 लोकमत'च्या बातमीचा इम्पॅक्ट
    एसटी महामंडळाला 500 कोटी तातडीनं वितरित 
    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानंतर निधी
    एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार
    महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार 

    16:29 (IST)

    मुंबई - 50 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
    महापालिका आणि खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक
    महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली नावं
    5 सप्टेंबरला शिक्षकदिनी होणार पुरस्कारांचं वितरण 

    15:11 (IST)

    पुण्यात गोळीबार करून चोरी करण्याचा प्रयत्न
    खडकमाळ आळीजवळच्या हिना टॉवरमधील घटना
    रहिवाशांच्या मदतीनं पोलिसांकडून चोरट्याला अटक
    विठ्ठल वामन भोळे असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव 

    14:29 (IST)

    ठाणे मनपा अतिक्रमण हटाव विभागाची कारवाई
    बेकायदेशीर फेरीवाले आणि दुकानदारांना हटवलं
    पिंपळेंवरील हल्ल्यानंतर पालिका अॅक्शन मोडवर

    कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स