मुंबई, 21 जुलै: राज्यातील कोरोना संसर्गाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) ओसरत आहे. मात्र तरीही राज्यावर संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका सांगण्यात आला आहे. मात्र कोरोनाबाधितांच्या मृतांच्या संख्येत रोज भर पडतच आहे. त्यातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातल्या मृतांच्या (Deaths Reconciled) संख्येत नव्यानं भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा (Deaths Reconciled by Maharashtra) आकडा वाढलेला दिसतोय. ही नोंद एका दिवशीची नसून गेल्या काही महिन्यातील आहे.
राज्यातल्या मृतांच्या आकड्यात 3509 नव्या मृतांची भर पडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या मृतांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट होतं. त मात्र आरोग्य विभागानं त्याची तपासणी केली. त्यानंतर या रुग्णांचा मृत्यू कोरोनानं झाला असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा अपडेट केला. त्यानुसार राज्यातल्या मृतांच्या आकड्यात आता नव्यानं 3509 ची भर पडली आहे.
आज ही धक्कादायक माहिती समोर आहे. सकाळी देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर झाली. यादरम्यान राज्यातल्या मृतांच्या आकडेवारीसंदर्भातली ही माहिती उघड झाली आहे.
हेही वाचा- काय आहे कोरोनाची Warm Vaccine? का होतेय त्याची चर्चा, वाचा सविस्तर
मंगळवारी दिवसभरात राज्यात 7 हजार 510 रूग्ण कोरोनामुक्त झालेत तर 6 हजार 910 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी 147 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 60 हजार 911 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.33 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 30 हजार 753 रूग्णांचा मृत्यू झाला. त्यात या नव्या 3509 मृतांची भर पडली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.09 टक्के एवढा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus, Maharashtra