मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /उंदरांवर प्रयोग केलेल्या कोरोनाच्या वार्म व्हॅक्सिनची जगभर चर्चा, होईल मोठा फायदा

उंदरांवर प्रयोग केलेल्या कोरोनाच्या वार्म व्हॅक्सिनची जगभर चर्चा, होईल मोठा फायदा

Warm Vaccine: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी स्टार्ट अप फर्म मिनवॅक्ससोबत मिळून अशी एक व्हॅक्सिन तयार केली आहे की, ज्याच्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता नाही.

Warm Vaccine: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी स्टार्ट अप फर्म मिनवॅक्ससोबत मिळून अशी एक व्हॅक्सिन तयार केली आहे की, ज्याच्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता नाही.

Warm Vaccine: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी स्टार्ट अप फर्म मिनवॅक्ससोबत मिळून अशी एक व्हॅक्सिन तयार केली आहे की, ज्याच्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता नाही.

नवी दिल्ली, 21 जुलै: कोरोनाचं संकट (Corona Virus) अद्याप गेलेलं नाही. संपूर्ण जग कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करत आहे. अशातच कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रत्येक देशात लसीकरणावर (Corona Vaccine) भर दिला जात आहे. जगात वेगवेगळ्या देशांमध्ये कोविशील्ड (Covishield), कोव्हॅक्सिन, स्पुतनिक वी ( Sputnik V), फायजर माडर्ना, एस्ट्राजेनेका सारख्या व्हॅक्सिनचा वापर केला जातोय. दरम्यान व्हॅक्सिन सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी कमी तापमानाची गरज असते. मात्र इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शास्त्रज्ञांनी स्टार्ट अप फर्म मिनवॅक्ससोबत मिळून अशी एक व्हॅक्सिन तयार केली आहे की, ज्याच्यासाठी कमी तापमानाची आवश्यकता नाही. या व्हॅक्सिनचा प्रयोग उंदरांवर केला आणि त्यातून अधिक चांगला निकला मिळाल्याचा दावा केला जात आहे.

काय आहे वार्म व्हॅक्सिन (Warm Vaccine)

व्हॅक्सिनचे डोस सुरक्षित ठेवण्यासाठी कमी तापमान म्हणजेच 2 हून 8 डिग्री तापमानची आवश्यकता असते. तर काही व्हॅक्सिनसाठी -70 डिग्रीपर्यंत तापमानाची गरज असते. मात्र IISC द्वारे तयार करण्यात आलेली व्हॅक्सिनला 37 डिग्री सेल्सियसवर एक महिना आणि 100 डिग्री सेल्सियसवर जवळपास दीड तास पर्यंत ठेवू शकता. शास्त्रज्ञांचं म्हणणे असे आहे की, अशा लसी जास्त तापमानातही प्रभावी राहतात. त्याला वार्म व्हॅक्सिन असं म्हणतात.

तालिबान अतिरेक्यांनी दानिश सिद्दीकींचं डोकं कारखाली चिरडलं, भयानक सत्य उघड

शास्त्रज्ञांनी सांगितलं कारण

मेलबर्नमधील CSIROच्या ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर डिसीज प्रिपरनेसच्या संशोधकांनी सांगितलं, रोगप्रतिबंधक लस दिल्यानंतर काही उंदरांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. या उंदारांना डेल्टा व्हेरिएंटसह कोरोना व्हायरसच्या विविध व्हेरिएंटनं संक्रमित करण्यात आलं. प्रोजेक्टचे लीडर डॉ. एसएस वासन यावर म्हणाले की, मिनवॅक्स लसीकरण केलेल्या उंदरांनी सर्व प्रकारच्या कोरोना व्हायरस विरूद्ध तीव्र प्रतिकारशक्ती दर्शवली. आमचा डेटा दर्शवतो की, मिनवॅक्सनं अशा अॅटिबॉडीज तयार केल्या की ज्यात अल्फा, बीटी, गामा आणि डेल्टासह सर्व व्हेरिएंट्स सर्व दूर करण्यासाठी व्यवस्थापित ठरल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus