मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

परदेशात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा; लसीकरणाबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

परदेशात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा; लसीकरणाबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

एखादी व्यक्ती परदेश दौर्‍यावर जाणार असेल तर अशा परिस्थितीत कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield Vaccine) दुसरा डोस 28 दिवसानंतर कधीही घेता येऊ शकतो. सध्या, कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी घेण्याचा नियम आहे.

एखादी व्यक्ती परदेश दौर्‍यावर जाणार असेल तर अशा परिस्थितीत कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield Vaccine) दुसरा डोस 28 दिवसानंतर कधीही घेता येऊ शकतो. सध्या, कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी घेण्याचा नियम आहे.

एखादी व्यक्ती परदेश दौर्‍यावर जाणार असेल तर अशा परिस्थितीत कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield Vaccine) दुसरा डोस 28 दिवसानंतर कधीही घेता येऊ शकतो. सध्या, कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी घेण्याचा नियम आहे.

नवी दिल्ली 08 जून: परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या (Students) आणि व्यावसायिकांच्या (Businessman) लसीकरणाबाबत केंद्र सरकारनं नवीन मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या आहेत. आता विद्यार्थी आणि व्यावसायिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस (First Dose of Vaccination) घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनंतर कधीही घेऊ शकतात. त्यांना 84 दिवस थांबण्याची सक्ती नाही. यामुळे शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि व्यवसायासाठी परदेशवाऱ्या कराव्या लागणाऱ्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत केंद्र सरकारने सोमवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. या मार्गदर्शक सूचनांनुसार, एखादी व्यक्ती परदेश दौर्‍यावर जाणार असेल तर अशा परिस्थितीत कोव्हिशिल्ड लसीचा (Covishield Vaccine) दुसरा डोस 28 दिवसानंतर कधीही घेता येऊ शकतो. सध्या, कोव्हिशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी घेण्याचा नियम आहे.

परदेश प्रवासासाठी कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांनाच लसीकरण प्रमाणपत्र (Vaccination Certificate) देण्यात येईल. लसीकरण प्रमाणपत्रात पासपोर्ट क्रमांकाचा उल्लेख अनिवार्य आहे. ज्यांना 31 ऑगस्टपर्यंत परदेशात जाण्याची इच्छा आहे, अशा 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ही सुविधा आहे. लवकरच परदेश प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही विशेष व्यवस्था कोविन अॅपवर (Covin App) उपलब्ध होईल, असंही सरकारनं म्हटलं आहे.

कोणासाठी उपयुक्त आहे ही नवीन व्यवस्था :

- जे विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्यासाठी जात आहेत.

- परदेशात नोकरीसाठी जाणारे लोक.

- टोकियो ऑलिम्पिक्समध्ये (Tokyo Olympics) भाग घेण्यासाठी जाणारे खेळाडू, सोबत जाणाऱ्या व्यक्ती

सरकारनं यापूर्वी लसीकरणाबाबत जाहीर केलेल्या नियमानुसार कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये कमीतकमी 12 ते 16 आठवड्यांचे म्हणजे 84 दिवसांचे अंतर असणे बंधनकारक आहे. त्यामुळं परदेशात शिक्षण, नोकरी यासाठी जाणारे लोक तसंच जुलैमध्ये टोकियो इथं सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये भाग घेण्यासाठी जाणाऱ्या खेळाडूंना अडचणी निर्माण झाल्या होत्या. परदेशात अनेक ठिकाणी लसीकरण मोठ्या संख्येनं झाल्यानं तिथं विद्यापीठ, कॉलेजेस सुरू होत आहेत, तसेच व्यावसायिक कामकाजांनाही गती आली आहे. या पार्श्वभूमीवर लसीच्या दोन डोसमधील इतक्या दिवसांचे अंतर हे परदेशी जाणाऱ्या या लोकांसाठी मोठा अडथळा होता. तो सरकारनं दूर केला असून, या गटातील लोकांना यातून सूट दिली आहे. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेताना 28 दिवस झाले आहेत का याची दक्षता संबधित अधिकारी यंत्रणा घेईल. 28 दिवस झाले असतील तरच दुसरा डोस मिळेल आणि त्यानंतरच प्रमाणपत्र दिलं जाईल. प्रमाणपत्र असल्याशिवाय परदेश प्रवास करता येत नाही. त्यामुळं सरकारच्या या नव्या सूचनांचे विद्यार्थी, व्यावासायिक आणि क्रीडापटू यांच्याकडून स्वागत होत आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine