• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Coronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली, धारावीत 13 तर दादरमध्ये अवघे 16 रुग्ण

Coronavirus : राज्यातील आकडे दिलासादायक, मुंबईत रुग्णसंख्या झपाट्याने घटली, धारावीत 13 तर दादरमध्ये अवघे 16 रुग्ण

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

maharashtra corona update राज्यातील कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसंच मृत्यूचा दरही दीड टक्क्याच्या खाली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं (corona second wave) संपूर्ण देशात सध्या अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र तुलनेने कोरोना प्रसाराचा (corona infection) वेग कमी झाल्यानं काहीसा दिलासा आहे. रविवारचा विचार करत राज्यात पुन्हा एकदा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा (New Corona Patient) जवळपास 12 हजारांनी अधिक असल्याचं पाहायला मिळालं. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी 9 मे रोजी राज्यात एकूण 48 हजार 401 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर त्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा 60 हजार 226 एवढा आहे. राज्यात आजपर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 44 लाख 7 हजार 818 एवढी आहे. त्यामुळं बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण म्हणजे राज्याचा (Recovery Rate) 86.4 एवढा झाला आहे. राज्यात रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 572 आहे. तर राज्यातील सध्याचा मृत्यूदर 1.49% एवढा आहे. राज्यात सध्या 6 लाख 15 हजार 783 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 26 हजार 939 संस्थात्मक विलगीकरणात आहेत. (वाचा-कोल्हापूरने जपली छत्रपती शाहूंची शिकवण; कोरोनात धर्मनिरपेक्षतेचा दिला आदर्श) मुंबईचा विचार करता मुंबईमधून काहीसं दिलासादायक चित्र समोर येत आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. धारावी, दादर, माहिती या भागांमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं. धारावीमध्ये तर अवघे 16 आणि दादरमध्ये केवळ 16 रुग्ण आढळून आले. तर माहीममध्ये 34 रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्या कमी होत असल्यानं प्रशासनालाही काहीसा दिलासा मिळाला आहे. (वाचा-मविआत धुसफुस! मराठा आरक्षणावरून पटोलेंच्या राज्य सरकारला कानपिचक्या) पुण्याचा विचार करता पुण्यातील रुग्णांचा आकडाही दोन हजारांच्या घरात आलाय. रविवारी पुण्यात 2025 नवे रुग्ण आढळले. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुपटीहून अधिक म्हणजे 4825 एवढे आहे. रविवारी पुणे शहरातील 54 तर पुण्यात उपचार घेणाऱ्या बाहेरच्या 24 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. सध्या अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांचा आकडा 33732 एवढा आहे. राज्यात इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं राज्यातील कोरोना ग्रस्त रुग्णांचा आकडेवारी कमी होत असल्यानं आता प्रशासनाला पुढच्या धोक्यासाठी सज्ज होण्यासाठी तयारी करता येणार आहे. त्यामुळं आरोग्य सेवेवरील ताण कमी झाल्यानंतर झपाट्याने भविष्यातील सोयी सुविधा वाढवण्याकडं लक्ष द्यायला हवं.
  Published by:News18 Desk
  First published: