कोल्हापूर, 09 मे : संपूर्ण देशभरात कोरोनानं (coronavirus) हाहाकार माजवला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी परिस्थिती बिघडली असून माणुसकीही (Huminity) संपत असल्याचं चित्र दिसत आहे. पण एकिकंडं नाती कामी येत नसताना काही जण अगदी जात-धर्म (religion) विसरून मदतीसाटी पुढं येत असल्याचं समोर आलंय. अशाच आणखी एका घटनेनं कोल्हापूर (Kolhapur) अद्याप छत्रपती शाहूंची शिकवण विसरले नसल्याचं दाखवून दिलं आहे. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय या कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर हर्षला वेदक रुग्णसेवा देत आहेत. डॉ. हर्षला यांच्याबरोबर त्यांचे वडील सुधाकर वेदक हेही राहत होते. दोन आठवड्यांपूर्वी सुधाकर वेदक यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर डॉक्टर हर्षला वेदक यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. डॉक्टर हर्षला यांना लक्षण नव्हती पण सुधाकर वेदक यांची तब्येत हळूहळू बिघडू लागली. त्यामुळं त्यांना कोल्हापूरमधल्या अॅस्टर आधार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (वाचा- मविआत धुसफुस! मराठा आरक्षणावरून पटोलेंच्या राज्य सरकारला कानपिचक्या ) सुधाकर वेदक हे उपचारांना प्रतिसाद देत होते. पण त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळं रविवारी पहाटे त्यांचं निधन झालं. डॉक्टर हर्षला या घरी एकट्याच होत्या. त्यात त्यांनाही कोरोनाची लागण झालेली होती. त्यामुळं वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुणी करायचे असा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी अॅस्टर आधार रुग्णालयातील aster volyentiyer ग्रुप पुढे आला. या ग्रुपच्या सदस्य आणि हॉस्पिटलमधील प्रशासक आयेशा राऊत या मुस्लिम समाजातील महिलेनं सुधाकर वेदक यांच्यावर अंत्यसंस्कार केले. (वाचा- जास्त वेळ घराबाहेर राहणं ठरू शकतं घातक; हवेतून पसरतोय कोरोनाचा संसर्ग ) हॉस्पिटल मधून सुधाकर वेदक यांचा मृतदेह पंचगंगा स्मशानभूमीत आणण्यात आला. त्यावेळी पीपीई किट घालून त्यांच्या सोबत फक्त आयेशा राऊत होत्या त्यानंतर. स्मशान भूमीमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुधाकर यांच्या मृतदेहाला आयेशा राऊत या मुस्लीम महिलेनेच मुखाग्नी दिला. डॉक्टर हर्षला यांनी फोन करून विनंती केल्यानंतर त्यांच्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले असं आयेशा यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. अनेकदा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानंतर मृतदेहांची हेळसांड होते. अगदी नातेवाईकही मृतदेहाला हात लावत नाहीत. मात्र कोल्हापूर मध्ये राजर्षी शाहू महाराजांचं पुरोगामित्व जपत सुधाकर वेदक या 75 वर्षीय वृद्धाच्या मृतदेहावर एका मुस्लिम महिलेनं अंत्यसंस्कार करत आदर्श घालून दिला. आयेशा राऊत यांचं सर्वत्र कौतुक होत असून कोल्हापूरचा हा आदर्श राज्यात आणि देशात अंगीकारला तर नक्कीच कोरोना रुग्णांची हेळसांड होणार नाही हे नक्की.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







