बीड, 11 ऑक्टोबर: लखमीपूर खेरी (Lakhimpur Kheri News) घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीने आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड (Beed) शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे.
शिवसेनेनं सकाळीच रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना गुलाबाचं फुल देऊन आपली आपली दुकान बंद करण्याच आवाहन करीत आहेत. यात शिवसेनेचे नेते परमेश्वर सातपुते, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान जगताप, बाप्पासाहेब घुगे हे नेते रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी गांधीगिरी मार्गानी रस्त्यावर आहेत.
बीड- महा विकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना सकाळीच रस्त्यावर pic.twitter.com/5lOhZI3fPt
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2021
शिवसेनेकडून सकाळी 6 वाजेपासून रस्त्यावर उतरून दुकानदारांना आवाहन करत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक दिली आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली आहे.
बीडमध्ये बंदला सुरुवात pic.twitter.com/svrJjxsXCS
— News18Lokmat (@News18lokmat) October 11, 2021
आज महाराष्ट्र बंद
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. आज 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचं (Maharashtra Bandh 2021) आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.