रायगड, 18 ऑगस्ट : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमध्ये (Harihareshwar suspicious Boat) एक शस्त्राने भरलेली बोट आढळली आहे. ही घटना ताजी असताना श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ आणखी एक बेवारस स्थितीत फुगा बोट आढळली आहे. या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेले असा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगारजवळ बोर्ली सागरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बेवारस स्थितीत आणखी एक फुगा बोट संशयस्पदरित्या आढळली आहे. या बोटीतून काही जण किनाऱ्यावर पळून गेले असा संशय व्यक्त केला जात आहे. हरिहरेश्वरमध्ये सापडलेल्या याच बोटीमधील प्रवाशी हे अन्य एका फुगा बोटमधून प्रवास करत दिवे आगार जवळील किनाऱ्यालगत उतरून पळून गेले अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट, काय आहे 1993 ब्लॉस्टशी कनेक्शन?)
दरम्यान, रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती, असं फडणवीस म्हणाले.
या घटनेचा तपास दहशतवादविरोधी पथक करत आहे. याचा बारकाईने तपास सुरू आहे, सर्व भागात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्यासोबत को ऑर्डिनेशन सुरू आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
26 जूनला या बोटीचं इंजिन निकामी झालं त्यानंतर कोरियन युद्धनौकेनं त्यांची सुटका केली आणि त्यांना ओमानला सुपूर्द केले.समुद्र खवळला असल्याने बोटीचे टोईंग करता आले नाही. समुद्रातल्या अंतर्गत प्रवाहामुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली आहे, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.