मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mahad: महिला सरपंच हत्या प्रकरण, पोलिसांच्या तपासात नवी माहिती आली समोर

Mahad: महिला सरपंच हत्या प्रकरण, पोलिसांच्या तपासात नवी माहिती आली समोर

Mahad woman sarpanch murder case update: रायगड जिल्ह्यातली महाड येथे महिला सरपंचचाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून नवी माहिती समोर आली आहे.

Mahad woman sarpanch murder case update: रायगड जिल्ह्यातली महाड येथे महिला सरपंचचाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून नवी माहिती समोर आली आहे.

Mahad woman sarpanch murder case update: रायगड जिल्ह्यातली महाड येथे महिला सरपंचचाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून नवी माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Sunil Desale

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

महाड, 29 डिसेंबर : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील (Mahad Taluka Raigad) एका गावातील महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह (Woman sarpanch dead body found in naked position) सोमवारी आढळून आला. महिला सरपंचाची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. या महिलेचा जंगलय भागात मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने बलात्कार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आज येईल त्यानंतर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल. (Mahad woman sarpanch death case updates)

पोलीस तपासात नवी माहिती समोर

मंगळवारी सायंकाळी या महिलेवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले नव्हते. महाडचे डीवायएसपी निलेश तांबे यांच्या नेतृत्वात पोलिसांची एक टीम तपास करीत आहे. घटनास्थळी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले होते, महिलेचा खून झालेल्या ठिकाणापासून डॉग थेट वस्तीपर्यंत आल्याने आरोपी हा स्थानिक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वाचा : महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह, बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय

आरोपीला फाशी देण्याची मागणी

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून लवकरात लवकर आरोपीला पकडून त्यांना फाशी द्यावी अशी मागणी सर्वच पक्षांकडून केली जात आहे.

बलात्कार केल्याचा संशय

तुडील भेलोशी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला फाटी आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली. गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत फाट्यांची भारी पाहिली. मात्र कोणीही दिसले नाही म्हणून सदर तरुणाने परीसरात बघले असता रस्त्यालगत जंगल भागत सदर महिला मृतावस्थेत दिसून आली. अज्ञात इसमाने डोक्यात फाटा मारून त्यांचा खून केला असून मृतदेह विवस्त्र असल्याने अतीप्रसंग अगर बलात्काराचा संशय व्यक्त केला जात आहे.

लाकूड फाट्याची पहिली खेप घरी आणून टाकली. दुसऱ्या खेपेला मृतक सरपंच महिलेची आई घरीच थांबली, दबाधरून बसलेल्या नराधमाने त्यातच डाव साधला. मुलाच्या लग्नाची तयारी म्हणून लाकूड फाटे गोळा करण्यासाठी महिला सरपंच जंगलात गेल्या होत्या. रस्त्याच्या कडेला लाकडी फाटी गोळा करून ठेवण्यात आली होती, त्याच ठिकाणी लाकडी दांडक्याने फटका मारला असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान महिला सरपंचाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस विविध अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. त्या अँगलनेही पोलीस आपला तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल.

First published:

Tags: Crime, Mahad, Raigad