Home /News /maharashtra /

महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक, काँग्रेसच्या नाराजीवर आता तोडगा निघणारच?

महाविकास आघाडीची उद्या महत्त्वाची बैठक, काँग्रेसच्या नाराजीवर आता तोडगा निघणारच?

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील काँग्रेस पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी उद्या महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 16 फेब्रुवारी : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांमधील मतभेदाच्या अनेक बातम्या दर महिन्यात वारंवार समोर येत असतात. आतादेखील तशीच बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधील काँग्रेस (Congress) पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसची मनधरणी करण्यासाठी उद्या महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. ही बैठक उद्या संध्याकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या नाराजीवर चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सरकारच्या विविध निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीत काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एककीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असताना आता दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांना ते दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस नेत्यांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस पक्षाची सर्व नाराजी दूर करण्याता प्रयत्न केला जाणार आहे. नाना पटोलेंचं मंत्रिमंडळ विस्ताराचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 10 मार्चनंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं सूचक विधान केलं आहे. पण त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. नाना पटोले यांना मंत्री व्हायचं असल्याने ते तसं बोलत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. नाना पटोले यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या वक्तव्यातून महाविकास आघाडीवर दबाव निर्माण करण्यासाठीदेखील काँग्रेसचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ('सुशांतच्या हत्येनंतर मिलिंद नार्वेकरांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांचा दोनवेळा कॉल', नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट) नवाब मलिकांचा टोला "नाना पटोले ज्या पद्धतीने सांगत आहेत की, येत्या 10 मार्चनंतर मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. पटोले यांची इच्छा असेल तर त्यांच्या पक्षाकडून त्याबाबत शिफारस येईल. निश्चितच ते बदलासाठी शिफारस करु शकतात. पण मुख्यमंत्र्यांना त्याबाबतचा अधिकार आहे. शिफारस आली तर मुख्यमंत्री त्याबाबत नक्की निर्णय घेतील. पण इतर पक्षांचा याबाबतचा कोणताही विचार नाही. काँग्रेसचा विचार आहे की नाही, त्याबाबत मी नाही बोलू शकत. कारण नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते स्वत: मंत्री होतील. त्याचं मुहूर्त 10 तारखेला निघेल. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत", असं नवाब मलिक म्हणाले आहेत. दुसरीकडे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भाजप विरोधात राज्यभरात आंदोलन सुरु आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील 'सागर' या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं. हेच आंदोलन काँग्रेस पुढे राज्यभरात करण्याच्या भूमिकेत आहे. पण या आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आपण राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत येऊ, अशी भीती वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या