लखनऊ, 30 ऑगस्ट: कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांवर लोखंडी रॉडनं हल्ला (attack on woman police with iron rod) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणानं अश्लील कमेंट (passed obscene comment) केल्यानं त्याला जाब विचारला असता, त्यानं हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित महिला पोलिसाचं डोकं फुटलं असून त्या रक्तबंबाळ (Woman police injured) झाल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्याच्या अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. दरम्यान काल संबंधित महिला पोलीस अधिकारी अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालण्याचं काम करत होती. यावेळी प्रभात सिंह नावाच्या एका तरुणानं संबंधित महिला पोलिसावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. यावेळी महिला पोलिसांनं स्कुटी थांबवून संबंधित तरुणाला जाब विचारला.
हेही वाचा- लग्नानंतर 4 दिवसातच युवकाचं टोकाचं पाऊल; धक्कादायक घटनेनं साताऱ्यात खळबळ जाब विचारल्याचा राग आल्यानं आरोपी तरुणानं घरी जाऊन लोखंडी रॉड आणला आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीनं महिला पोलिसाला स्कुटीवर खाली पाडलं. हा विवाद पाहिल्यानंतर घटनास्थळावरील एका व्यक्तीनं याची माहिती पोलिसांना दिली. हेही वाचा- दोघांकडून निराधार महिलेसोबत अमानुष कृत्य; अंधाराचा फायदा घेत घरात शिरले अन्… घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी तरुणाला अटक केली आहे. तसेच जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणावर महिला पोलिसावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 333, 353 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.