जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भयंकर घटना! रोड रोलरखाली चिरडून 24 वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भयंकर घटना! रोड रोलरखाली चिरडून 24 वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भयंकर घटना! रोड रोलरखाली चिरडून 24 वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू

अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लोनावळा, 25 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भयंकर घटना घडली असून 24 वर्षीय इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे. महामार्ग दुरुस्तीचे काम सुरू असताना रोड रोलर खाली येऊन या तरुणाने आपला जीव गमावला. आनंद जगदाळे असं मृत तरुणाचं नाव आहे. एक्स्प्रेस वेवर रासायनी गावाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्ग देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. यावेळी आनंद जगदाळे हा तरुण रोड रोलरखाली चिरडला गेला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. आनंद जगदाळे हा नविन मेरीको या कंपनीमध्ये कार्यरत होता. अपघातानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हेही वाचा - धक्कादायक! चुलतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला, जागीच मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना नेमकं काय घडलं? आज सकाळपासून महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते. दरम्यान रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या इंजिनीअरला रोड रोलरची धडक बसली आणि समोरील चाकाखाली मयताचे डोके पूर्णपणे चिरडले गेले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. रोलर खाली अपघात झाल्याचे कळताच रोलर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरम्यान, महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात