मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धक्कादायक! चुलतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला, जागीच मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

धक्कादायक! चुलतीच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला, जागीच मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना

रागाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड घातल्याने आशाबाई साहेबराव भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रागाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड घातल्याने आशाबाई साहेबराव भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

रागाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड घातल्याने आशाबाई साहेबराव भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

इंदापूर, 25 जानेवारी : शेतजमिनीच्या वादातून पुतण्यानेच चुलतीची हत्त्या केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील काटी येथे घडली आहे. रागाच्या भरात डोक्यात कुऱ्हाड घातल्याने आशाबाई साहेबराव भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. साहेबराव भोसले यांचे कुटुंब आणि त्यांचा भाऊ विठ्ठल भोसले हे एकाच गावात राहतात. साहेबराव भोसले यांनी काटी गावच्या काटेश्वर देवस्थानची जमीन करार पद्धतीने कसायला घेतली आहे. त्या जमिनीचा साहेबराव भोसले आणि काटेश्वर देवस्थानचा वाद तहसीलदार यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान साहेबराव भोसले यांचा भाऊ विठ्ठल हा त्या जमिनीपैकी काही जमिनीच वाटा मागत आहे. परंतु साहेबराव भोसले हे कोर्टात झालेला खर्च मागत होते. 24 जानेवारी रोजी विठ्ठल भोसले यांचा मुलगा आणि साहेबराव यांच्या मुलात शेतातून मोटारसायकल घेऊन जाण्यावरुन वाद झाला होता. हेही वाचा -प्रियकर भाच्याच्या मदतीनं केली नवऱ्याची हत्या, पोलिसांसमोर रचला अपहरणाचा बनाव! संध्याकाळी 6 च्या सुमारास यातील आरोपी स्वप्निल उर्फ योगेश विठ्ठल भोसले, विठ्ठल महादेव भोसले, लक्ष्मी विठ्ठल भोसले हे साहेबराव भोसले यांच्या घरी आले. यावेळी त्यांच्यामध्ये जोराचे भांडण झाले. आम्हाला जमीन वाटून द्या, अशी मागणी केली जात होती. त्यातच अचानक स्वप्निल याने हातातील कुऱ्हाडीने आशाबाई भोसले यांच्या डोक्यात घाव घातला. जखमी आशाबाई यांना उपचारासाठी इंदापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसात रितसर फिर्याद दाखल करण्यात आली ऐहो. इंदापूर पोलिसांनी सदर आरोपींविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune crime, Pune crime news, Pune news

पुढील बातम्या