Live Update Marathi Breaking : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यासह जिल्ह्याला पावसाने रात्रभर झोडपलं. जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. याशिवाय आजपासून पुढील दोन दिवस पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात पालघर, पुणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे लालनाला प्रकल्प भरला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळं प्रकल्पात पाणी साठा वाढला आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात पुराचा धोका वाढला आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव मुर्तिजापूरचा संपर्क तुटला आहे, तर चिखली आणि खरप ढोरे या दोन गावांना पुराने वेढा घातला आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.