• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Leopard attack: सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत; घराबाहेरील कुत्र्याचा पाडला फडशा, थरकाप उडवणारा LIVE VIDEO

Leopard attack: सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत; घराबाहेरील कुत्र्याचा पाडला फडशा, थरकाप उडवणारा LIVE VIDEO

सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत; घराबाहेरील कुत्र्याचा पाडला फडशा, थरकाप उडवणारा LIVE VIDEO

सिंधुदुर्गात बिबट्याची दहशत; घराबाहेरील कुत्र्याचा पाडला फडशा, थरकाप उडवणारा LIVE VIDEO

Leopard attack on dog live video: सिंधुदुर्गात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

 • Share this:
  भारत केसरकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 27 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत बिबट्यांचा (Leopard) वावर दिसून येत आहे. तसेच मुंबई, पुण्यात बिबट्याने मनुष्यावर हल्ला केल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता सिंधुदुर्गात (Sindhudurg) बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना (Leopard attack on dog) समोर आली आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेरील सीसीटीव्हीत कैद (leopard attack caught in CCTV) झाली आहे. सिंधुदुर्गातील मालवण विरण बाजार येथे काल मध्यरात्री विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने कुत्र्याचा फडशा पाडला आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विरण बाजार परीसरात भरवस्थीत बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीवर हल्ला हडपसरच्या गोसाई वस्तीत एका तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने घबराट पसरलीय. संभाजी बबन हाटोळे हे बिबट्याच्या हल्ल्ह्यात जखमी झालेत. 26 ऑक्टोबर रोजी सकाळी ते मॉर्निग वॉकला गेले असताना बिबट्याने त्यांच्यावर पंजा मारून हल्ला केला. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला जेरबंद केलं आहे. हडपसरमधील गोसावी वस्तीत शिरलेल्या बिबट्याचा ठिकाणा रात्री आठच्या सुमारास लागला. दोन घरांच्या बोळीत हा बिबट्या लपून बसला होता. वनविभागाच्या रेस्क्यू टिमने डॉट मारून बिबट्याला पकडले. तासाभराच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद केलं. मुंबईत अंगणात बसलेल्या महिलेवर बिबट्याचा हल्ला बिबट्याने घराच्या अंगणात बसलेल्या महिलेवर हल्ला केल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती. सुदैवाने या हल्ल्याच महिलेचा जीव बचावला आहे. दरम्यान या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात भय परसलं होतं. या पूर्वी 4 वर्षांच्या रोहितवर एका बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये रोहितच्या वडिलांनी बिबट्याला हाकलून लावले. त्यामुळे आरे कॉलनीत राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बुधवारी (29 सप्टेंबर) झालेल्या हल्ल्याच्या व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत दिसत होते की, एक महिला घराच्या अंगणात बसली आहे. याचवेळी मागून बिबट्याच्या डोळे चमकताना दिसत आहे. बिबट्या मागून महिलेवर हल्ला करतो. महिला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू करते. यावेळी तिच्या हातात काठी असते आणि ती ही काठी बिबट्यावर उगारू लागते. त्यामुळे बिबट्या जरा मागे होते. दरम्यान बिबट्या तेथून पळ काढतो. तेवढ्यात घरातील मंडळी बाहेर येतात. आणि महिलेचा यातून जीव वाचतो.
  Published by:Sunil Desale
  First published: