ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 20 फेब्रुवारी: राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेला लवकरच सुरुवात होत आहे. या परीक्षेत हमखास यशाचा पॅटर्न म्हणून लातूर पॅटर्नकडे पाहिले जाते. लातूर पॅटर्न मधील ट्रिक्स वापरून विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची अनेक उदाहरणे आहेत. 12 वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र (केमेस्ट्री) या विषयाचे टेंशन असते. पण लातूरमधील विद्यार्थी ज्या ट्रिक्स वापरतात त्या काही खास ट्रिक्स वापरल्यास आपल्यालाही 100 टक्के गुण मिळवता येतील.
लातूर पॅटर्नमध्ये प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी खास मार्गदर्शन करतात. परीक्षेत पेपर सोडवण्याच्या टेक्निकवर भर देतात. प्रत्येक विषयाच्या तज्ञाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. त्यातून विद्यार्थ्यांना पडलेले प्रश्न आणि अडचणींची सोडवणूक केली जाते. रसायनशास्त्राचा पेपर सोडवण्यासाठीही काही खास ट्रिक्स वापरल्यास गुणांत फायदा होऊ शकतो. Latur Pattern: 12 वीत गणिताचं नो टेन्शन; या ट्रिक्सनी मिळतील पैकीच्या पैकी गुण, Video या पद्धती वापरा व केमिस्ट्रीत चांगले मार्क मिळवा. 1. बारावी बोर्ड परीक्षेत सेक्शन ए मध्ये विद्यार्थ्यांनी दहा पैकी आठ प्रश्न सोडवावेत. ज्यामध्ये एम सी क्यू पद्धतीचे प्रश्न असतात .त्याची अचूक उत्तरे लिहून पैकीच्या पैकी गुण मिळवता येतात. 2. सेक्शन B 16 मार्काचा आहे. त्यात प्रत्येकी दोन गुणांचे प्रश्न असतात. जर प्रश्न न्यूमरिकल असेल तर उत्तर युनिटमध्ये लिहावे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण वाढण्यास मदत होते. 3. रिएक्शन वर जर प्रश्न असेल तर त्याचे विश्लेषण लिहू नका ती रिएक्शन सोडवून घ्या. 4. सेक्शन C मध्ये 24 मार्काचा प्रश्न आहे. त्यात मुद्देसूद उत्तरे लिहिण्यास महत्त्व आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी हे उत्तर चार विभागात विभागून लिहावे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मार्क वाढण्यास मदत होते. 5. सेक्शन D हा 12 गुणांचा आहे यात प्रत्येकी चार गुण असतात. यामध्ये फक्त विद्यार्थ्यांनी तीन प्रश्न सोडवावेत अतिरिक्त सोडवत बसून वेळ वाया घालू नये. 6. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक धड्याखालील फॉर्मुले वेगळे लिहून ठेवा व ते मुखपाट करा. 7. केमिस्ट्री मध्ये केमिकल रिएक्शन याला महत्त्व आहे. या सर्व केमिकल रिअॅक्शन सोडवण्याचा सराव करावा. ज्यामुळे परीक्षेत रिएक्शन सोडवताना जास्त वेळ वाया जाणार नाही. 8. केमिस्ट्री हा विषय लिहून लिहून पाठ करण्याचा आहे. त्यामध्ये फॉर्मुले व रिॲक्शन पाठ करून लक्षात राहत नाहीत. यामुळे ते लिहून पाठ करावेत. 9. वेगवेगळ्या सराव प्रश्नपत्रिका सोडवा व त्या स्वतः तपासा ज्यामधून नेमकी चूक कुठे होते हे लक्षात येईल. या सर्व पद्धतीचा अवलंब करून लातूर पॅटर्न मधील विद्यार्थी केमिस्ट्री या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवतात. प्राध्यापक व विद्यार्थी या सर्व पद्धतीचा वापर करून आपला निकालाचा टक्का वाढवतात. ज्यामुळे लातूर पॅटर्न हे आकर्षणाचा बिंदू बनला आहे.