ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 12 एप्रिल : रंगीत करकोचा ही पक्ष्यांची दुर्मीळ जात महाराष्ट्रात फक्त 4 ठिकाणी आढळते. त्या चार ठिकाणांमध्ये लातूरचा समावेश आहे. पिकांची कोणतीही इजा न करणारा हा करकोचा शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यातल्या शिवनी कोतल जवळच्या झाडांवरील त्य़ांच्या घरट्यांची नासधूस केल्याचा प्रकार उघड झाला आहे. शिकारीच्या उद्देशानं ही नासधूस करण्यात आल्याचं उघड झालं असून त्यात सात पिलांचा मृत्यू झालाय. गावकऱ्यांनी या प्रकरणात सतर्कता दाखवल्यानं आणखी नुकसान टळले आहे. काय आहे प्रकरण? लातूर जिल्ह्यातल्या शिवनी कोतल येथील तलावाच्या जवळ असलेल्या झाडांवरील घरट्यात 250 रंगीत करकोचे 400 पेक्षा जास्त पिलांसह राहतात. पक्षी मित्र धनंजय गुट्टे यांनी ही वसाहत शोधून काढलीय. या विशेष म्हणजे या वसाहतीचे संरक्षण व्हावे याची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. आमदार धीरज देशमुख यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत साकडे घातले होते.
रंगीत करकोचा हा पक्षी शिकाऱ्यांचेही विशे्ष लक्ष्य असल्याचं या प्रकरणातून पुन्हा एकदा उघड झालंय. गावकऱ्यांच्या जागृकतेमुळेच हा प्रकार उघड झालाय. त्यांनी या प्रकरणात तीन शिकाऱ्यांना अडवून वन विभागाच्या ताब्यात दिलंय. त्यांना वनकोठडी देण्यात आलीय. लातूर जिल्ह्यात आहे श्वानांचं गाव, परदेशातूनही आहे मागणी पण… पाहा Video या प्रकरणात प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर तलावाच्या जवळ कायमस्वरूपी वनसंरक्षक नेमण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान वन विभागानंगही याबाबत तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.