ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 2 जून : इयत्ता दहावीची परीक्षा म्हणजे आयुष्यातील पहिला महत्वाचा टप्पा. तो टप्पा यशस्वीरित्या पार केलेल्या गुणवंतांनी लातूर पॅटर्नचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. लातूर बोर्डाचा यंदाचा दहावीचा निकाल 92.67 टक्के इतका लागला. यावर्षी निकालाचा टक्का चांगलाच घसरला आहे. मात्र तरीही निकालात ‘लातूर पॅटर्न’ने बाजी मारली आहे. राज्यात 151 विद्यार्थी हे 100 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यातले तब्बल 108 विद्यार्थी आहेत ते एकट्या लातूर विभागातले आहेत. ‘लातूर पॅटर्न’ची कीर्ती अबाधित राज्याच्या विविध विभागातल्या एकूण 151 विद्यार्थ्याना 100 टक्के गुण मिळाले आहेत. त्यातले सर्वाधिक 108 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. हे 100 टक्के गुण ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’चे मिळून आहेत, दरवेळीप्रमाणे याहीवेळी दहावीच्या निकालात ‘लातूर पॅटर्न’ची कीर्ती अबाधित राहिली आहे. यामध्ये केशवराज विद्यालयातील 11 विद्यार्थी हे 100 टक्के गुण घेण्यात यशस्वी झाले आहेत.
Dombivli News : तिला पायावर उभा राहणेही कठीण, शिक्षक घरी येऊन शिकवायचे, आज समृद्धीने मिळवले 83 टक्केअभ्यासातील नियमितपणा यश दहावीत काही विषयाची मनात भीती होती. त्यासाठी वेगळा वेळ दिला. शांतपणे त्या विषयाचा अभ्यास केला. दिवाळीपासूनच शाळेमध्ये सराव परीक्षेला सुरुवात झाली होती. त्यामुळे तयारीही झाली आणि बोर्डाच्या परीक्षेबाबतची भीतीही कमी झाली. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबाबत सातत्याने सांगितले जात होते. त्यामुळे परीक्षेत ऐनवेळी कसली गडबड उडाली नाही. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अभ्यासातील नियमितपणा यामुळे 100 टक्के गुण मिळविणे शक्य झाले, असं केशवराज विद्यालयाच्या विद्यार्थी कैवल्य मोटेगावकर याने लोकल18 शी बोलताना सांगितले. यश मिळविता येते किती वेळ अभ्यास केला यापेक्षा कोणत्या पद्धतीने अभ्यास झाला यालाच अधिक महत्व दिले. रात्री उशिरापर्यंतच अभ्यास करावा असे काही नाही. नियमित 3 तास अभ्यास करूनही यश मिळविता येते. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाची वेळ निभावल्याने हे शक्य झाले. आता केवळ एक टप्पा पूर्ण झाला आहे. भविष्यातही मोठी आव्हाने समोर असून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करावयाचे आहे, असं केशवराज विद्यालयाची विद्यार्थिनी सिद्दी वाघमारे हिने लोकल18 बोलताना सांगितले.