जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Latur News : आईला होणारी मारहाण पहावली नाही; पोराने जन्मदात्याला.. लातूर हादरलं

Latur News : आईला होणारी मारहाण पहावली नाही; पोराने जन्मदात्याला.. लातूर हादरलं

लातूर हादरलं

लातूर हादरलं

Latur News : लातूर शहरात आईला मारहाण करतात म्हणून मुलाने बापाल संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी मुलगा पसार झाला होता.

  • -MIN READ Latur,Latur,Maharashtra
  • Last Updated :

सचिन सोळुंके, प्रतिनिधी लातूर, 5 जून : लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील आंबा हनुमानाच्या पाठीमागे असलेल्या रेणुकानगरात पोराने बापाला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली. आईला मारहाण करत असल्याने बापाच्या पोटात चाकू खूपसून मुलानेच आपल्या जन्मदात्याचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण?     लातूर शहरातील रेणुकनगरात सोमनाथ मधुकर क्षीरसागर (वय 48) वर्षे यांचे कुटुंब दिनू जानकर यांच्याकडे भाड्याच्या घरात राहते. 3 जूनच्या रात्री साडे नऊच्या सुमारास सोमनाथ क्षीरसागर व त्याची पत्नी मंगल क्षीरसागर यांच्यात भांडण सुरू झाले. सोमनाथ आपल्या पत्नीला मारहाण करीत होता. हे त्याचा मुलगा रोहित सोमनाथ क्षीरसागर (वय 23) याला बाप आपल्या आईला मारहाण करून त्रास देतोय हे सहन न झाल्याने रोहितने घरातील चाकू काढून बापाच्या पोटात व छातीवर चाकूने सपासप वार केले. यात सोमनाथ यांचा मृत्यू झाला. वाचा - घरातील गेले बाहेर, शेजारच्या मुलाने साधला डाव, 15 वर्षीय मुलीसोबत संतापजनक कृत्य मृत सोमनाथ यांची पत्नी मंगल क्षीरसागर हिने दिलेल्या फिर्यादीवरून 4 जून रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रोहित क्षीरसागर याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगल सोमनाथ क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा रोहित सोमनाथ क्षीरसागर याच्याविरोधात गुरनं. 402/2023 कलम 302 भादंवि प्रमाणे रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कराड करत आहेत. सोमवारी पहाटे मुलाला अटक जन्मदात्या बापाचा चाकूने भोसकून खून केल्यानंतर आरोपी मुलगा रोहित हा घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत त्याला सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , latur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात