सय्यद कयम रजा, प्रतिनिधी पीलीभीत, 5 जून : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, बलात्कार तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजाऱ्याने बलात्कार केला. ती झोपलेली असताना तिला घरातून उचलून बागेत नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - पिलीभीत जिल्ह्यातील सेहरामऊ पोलीस स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, तिच्या भावाचा मुलगा मरण पावला, म्हणून ती तेथे गेली होती. यावेळी मुलगी घरात झोपली होती. मात्र, ती रात्री परत आली तेव्हा मुलगी घरात सापडली नाही.
कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेतला असता शेजारच्या एका भागात ती रक्ताने माखलेली आढळून आली. तिथे गावातील अमित नावाचा मुलगा हजर होता. यानंतर कुटुंबीयांनी अमितवर आरोप त्याच्यावर तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी 376, 3/4 पास्को कायद्यान्वये गुन्हाही दाखल केला आहे. यासोबतच पोलीस मुलीची वैद्यकीय तपासणी करत असून पुढील तपास सुरू आहे.