ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 4 एप्रिल: जगभरात विविध आजारांनी लोक त्रस्त आहेत. तसाच एक आजार म्हणजे थायरॉईड हा होय. सध्या हा आजार सामान्य बनत चालला आहे. भारतातही थायरॉईड रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. जवळपास 32 टक्के लोक थायरॉईडने ग्रस्त असून यात महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. राज्यातही मिशन थायरॉईड ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयात मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. रुग्णांना थायरॉईड झाल्याची नसते माहिती थायरॉइडची एक समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या 1/3 व्यक्तींना हा आजार झाल्याची कल्पनाच नाही. हा आजार महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. गरोदर महिलांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या 3 महिन्यांच्या कालावधीत थायरॉइडची समस्या 44.3% महिलांमध्ये आढळते.
थायरॉईड शरीरात बॅटरीसारखे काम करते थायरॉइड ही शरीरातील गळ्याच्या भागात फुलपाखरासारख्या आकाराची एक ग्रंथी असते. या ग्रंथीमधून काही संप्रेरके स्त्रवतात. मेंदू, हृदय, स्नायू व इतर अवयवांचे कार्य नीट सुरू राहावे यासाठी ही संप्रेरके आवश्यक असतात. थायरॉइडमुळे शरीर ऊर्जेचा वापर करते आणि त्याला उबदार ठेवते. म्हणजे, थायरॉइड शरीरासाठी एक प्रकारे बॅटरीसारखे काम करते. या ग्रंथीमधून स्त्रवणारी संप्रेरके प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात स्त्रवली तर थायरॉइडच्या आजाराची लक्षणे दिसून येतात, असे डॉ. नीलिमा देशपांडे यांनी सांगितले. तर हायपर थायरॉइडिझम होतो थायरॉइड ग्रंथी शरीरासाठी आवश्यक असलेल्या संप्रेरकांची निर्मिती करू शकली नाही तर त्याला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. एखाद्या खेळण्यातील बॅटरी संपल्यावर त्या खेळण्याची जी स्थिती असते, हायपोथायरॉइडिझम त्याच प्रकारचा आजार असतो. शरीराच्या इष्टतम कार्यक्षमतेपेक्षा कमी क्षमतेने शरीराचे कार्य सुरू असते. अशा रुग्णांना थकवा लवकर येतो. पण थायरॉइड ग्रंथी अति-क्रियाशील असली तर हायपर थायरॉइडिझम होतो. अति प्रमाणात कॅफिनचे सेवन केले तर व्यक्तीची जी परिस्थिती होईल, तशीच परिस्थिती हायपर थायरॉइडिझमच्या रुग्णांची होते. तिसरा प्रकार म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सूज येणे. याला गलगंड म्हणतात. हा आजार औषधांनी बरा झाला नाही तर शस्त्रक्रिया करावी लागते. Latur News: थायरॉईडच्या रुग्णांसाठी मोठी बातमी, दर आठवड्यात ‘या’ दिवशी करा मोफत तपासणी, Video या आजाराची लक्षणे काय आहेत? हायपोथायरॉइडची लक्षणे : वजन वाढणे, चेहरा, पाय यांना सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, आळस येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, जास्त थंडी वाजणे, पाळीमध्ये बदल होणे (महिलांसाठी), केस गळणे, गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवणे. हायपर-थायरॉइडची लक्षणे : यात शरीराच्या आवश्यकतेपेक्षा थायरॉइड संप्रेरके जास्त प्रमाणात स्त्रवली जातात. परिणामी, आहार सामान्य असूनही वजन कमी होते, अतिसार होतो, चिंतातूरता निर्माण होते, हात व पाय थरथरतात, उष्णतेचा खूप त्रास होणे, स्वभावात तीव्र चढ-उतार, हृदयाच्या ठोक्यांची गती कमी-अधिक होणे, दृष्टी धुसर होणे, मेंटल फॉग इत्यादी लक्षणे दिसू शकतात, असे डॉ. देशपांडे म्हणाले. उन्हाळ्यात मडक्याचं पाणी पिण्याचे फायदे, फक्त ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात स्त्रियांमध्ये थायरॉईडचे प्रमाण जास्त 10 स्त्रियांमागे दोन स्त्रियांना थायरॉईडची लक्षणे किंवा थायरॉईडची लागण झालेली दिसून येते. स्त्रियांमध्ये थायरॉईड या रोगाबाबत अवेअरनेस करण्यासाठी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभागात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर नीलिमा देशपांडे यांनी केले.