ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 20 मार्च: प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करणे आव्हानात्मक असल्यामुळे पर्यावरणात हा कचरा तसाच असतो. हा कचरा मानवासोबतच पशु-पक्षी आणि निसर्गासाठीही धोकादायक आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरातील ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या मार्फत ‘इको ब्रिक्स’ची मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये प्लास्टिकच्या विटांचा वापर करून बसण्यासाठी बेंचेस बनवण्याचे कार्य केले जात आहे. विद्यार्थ्यांनी घरातून जमा केला प्लास्टिक कचरा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सांगून प्लास्टिक गोळा करण्यात आले. त्यातील मोठा वाटा हा घरगुती प्लास्टिक कचरा असल्याचे निदर्शनास आले. यात खाद्यपदार्थांचे प्लास्टिकचे आवरण जास्त होते. सोबत प्लास्टिकच्या कॅरीबॅग मोठ्या प्रमाणात होत्या.
इको ब्रिक्स कशा बनवल्या? घरातून जमा केलेला प्लास्टिक कचरा साफ करून तो पाण्याच्या रिकाम्या बाटलीत किंवा जारमध्ये भरून त्याचे इको ब्रिक्समध्ये रूपांतर केले. त्याचबरोबर झाडे लावल्यानंतर शिल्लक काळा पिशव्यांचा वापर देखील यामध्ये करण्यात आला आहे. एक लिटर प्लास्टिकच्या बाटलीत 200 ते 300 ग्राम प्लास्टिक भरले जाऊ शकते. क्रीडा संकुल येथे बनवला इको ब्रिक्स बेंच सध्या वापरल्या जाणाऱ्या मातीच्या विटांप्रमाणेच प्लास्टिकच्या विटाही मजबूत होतात. त्याचप्रमाणे कचऱ्याचेही प्रमाण कमी करण्यास मदत होईल. सुमारे ७२ किलो प्लास्टिकचा कचरा व 250 पाण्याच्या बॉटल यांचा वापर करून जिल्हा क्रीडा संकुल येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बेंच बनवण्यात आला. विमानात कधीही न बसलेला जिल्हा परिषदेचा विद्यार्थी करणार नासासाठी उड्डाण! Video शहरातील इतर ठिकाणीही बनवणार इको ब्रिक्स बेंच आता प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा क्रीडा संकुल येथे इको ब्रिक्स बेंच बनवला आहे. याच स्वरूपाचे अनेक बेंच लातूर शहरामध्ये बनविण्याचा मानस लातूर ग्रीन वृक्ष टीम यांचा आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्या कारणामुळे ही एक जागतिक समस्या म्हणून समोर येते आहे. याचा रियूज करून तो कचरा संकलित ही होतो आणि इतरत्र न पडता त्या बॉटल एकत्र एका ठिकाणी लावून त्याचा योग्य वापरही केला जाऊ शकतो.