जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लग्नासाठी हॉल बुक करण्याचं टेन्शन संपलं, थेट मंगल कार्यालयच येणार दारात! पाहा Video

लग्नासाठी हॉल बुक करण्याचं टेन्शन संपलं, थेट मंगल कार्यालयच येणार दारात! पाहा Video

लग्नासाठी हॉल बुक करण्याचं टेन्शन संपलं, थेट मंगल कार्यालयच येणार दारात! पाहा Video

लातूरमधील दयानंद दरेकर यांनी मोबाईल मंगल कार्यालय सुरू केले आहे. या चालत्या फिरत्या मंगल कार्यालयाने आनंद महिंद्रांनीही भूरळ घातली आहे.

  • -MIN READ Latur,Maharashtra
  • Last Updated :

    ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 16 मार्च: गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. असाच काहीसा प्रकार लातूरमधील दयानंद दरेकर यांच्या बाबतीत घडला. परंपरागत मंडपाचा व्यवसाय करत असतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यासाठी त्यांनी थेट चालते फिरते मंगल कार्यालय तयार केले. ‘मंडपाच्या दरात मंगल कार्यालय दारात’ योजनेमुळे या अनोख्या मंगल कार्यालयाची खूप चर्चा होतेय. विशेष म्हणजे त्यांच्या या मंगल कार्यालयाची दखल उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील घेतली आहे. दरेकर यांचा मंडप व्यवसाय दयानंद दरेकर हे मंडप व्यवसायिक आहेत. या व्यवसायात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वेळ, कामगार आणि व्यवस्थापन यांचा मेळ घालताना नाकी नऊ येत होते. दरेकर यांना नवीन संकल्पना घेवून आपला व्यवसाय वाढविण्याची गरज होती. या गरजेतूनच त्यांनी चालते फिरते मंगल कार्यालय सुरू करण्याची कल्पना सुचली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    चालते फिरते मंगल कार्यालय झाले तयार दरेकर यांच्या या कल्पनेची सुरुवातीला अनेकांनी चेष्टा केली. पण दरेकर यांनी निश्चय करून आपली चालते फिरते मंगल कार्यालय सुरू करण्याची कल्पना प्रत्यक्षात आणलीच. एका ट्रक मध्ये मंगल कार्यालयाची सुरुवात केली. यात एसी हॉल, साऊंड सिस्टीम, स्टेज व अत्याधुनिक सर्व सोई सुविधा आहेत. हॉलची साइज 30x40 फूट असून खुर्चीवर 150 ते 200 लोक सहज बसू शकतात. मंडपाच्या दरात मंगल कार्यालय दारात आज मंगल कार्यालयात लग्न करायचे म्हटले तर तीन ते पाच लाखांचा खर्च सहज होतो. पण या मोबाईल मंगल कार्यालयामुळे हाच खर्च तीस ते चाळीस हजारात भागत आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असला तर एक कॉल करून मंगल कार्यालयच कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलावता येते. लॉकडाऊनमध्ये सुचली बैलगाडी बनवण्याची कल्पना, स्वत:सह अनेक महिलांचं बदललं नशीब, Video कौटुंबिक, राजकीय कार्यक्रम शक्य या मंगल कार्यालयात लग्न समारंभ, नामकरण सोहळा, हळदी कुंकू कार्यक्रम, वाढदिवस असे कौटुंबिक कार्यक्रम करता येतात. तसेच स्नेह संमेलन, सेमिनार, स्टेज शो, स्वागत समारंभ असे राजकीय शैक्षणिक कार्यक्रमही करता येतात. त्यासाठी हे मोबाईल मंगल कार्यालय पाहिजे तिथे घेऊन जाता येते. आनंद महिंद्रांनी घेतली दखल दरेकर यांच्या या अफलातून संकल्पनेची चर्चा देशभर झाली. अगदी आनंद महिंद्रा यांनी ही त्यांच्या कल्पनेला दाद दिली. आनंद महिंद्रा यांनी दरेकर यांना भेटीसाठी बोलावून घेतले. तसेच या कल्पनेबाबत माहिती घेतली. त्यांनी या प्रोजेक्टवर काम करण्याचा मानस दाखवला असून ही संकल्पना म्हणजे येणाऱ्या काळात अनेक लोकांचा वेळ वाचवेल असे महिंद्रा म्हणाले. सातासमुद्रापार फेमस असलेलं कोल्हापुरी मटणाचं लोणचं कसं बनतं? पाहा Recipe Video प्रत्येक जिल्ह्यात फिरते मंगल कार्यालय सुरू करणार लोकांचा या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात चालते फिरते मंगल कार्यालय सुरू करायचे आहे. जेणेकरून लग्नाचा खर्च कमी होऊन सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, असे दरेकर सांगतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात