जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लॉकडाऊनमध्ये सुचली बैलगाडी बनवण्याची कल्पना, स्वत:सह अनेक महिलांचं बदललं नशीब, Video

लॉकडाऊनमध्ये सुचली बैलगाडी बनवण्याची कल्पना, स्वत:सह अनेक महिलांचं बदललं नशीब, Video

लॉकडाऊनमध्ये सुचली बैलगाडी बनवण्याची कल्पना, स्वत:सह अनेक महिलांचं बदललं नशीब, Video

Mumbai News : बाबासाहेब नंनवरे हे आकर्षक अश्या लाकडी लहान आकाराच्या बैलगाडी तयार करतात. यामुळे महिलांनाही रोजगार मिळत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 16 मार्च : बैलगाडी म्हंटल की, आपल्याला गावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. गावी गेल्यावर पाहायला मिळणाऱ्या बैलगाड्यांची  संख्या दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. तसेच या बैलगाड्या बनविणारे कारागीर सुध्दा हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच उरले आहेत. येत्या काळात बैलगाडी येणाऱ्या पिढीला पाहता येईल का नाही सांगता येत नाही. मात्र, बैलगाडी कशी दिसायची हे नक्की अनुभवता येणार आहे. कारण बीड जिल्ह्यातील चिंचवण गावात राहणारे बाबासाहेब नंनवरे यांनी आकर्षक अश्या लाकडी लहान आकाराच्या बैलगाडी तयार केल्या आहेत. नवी  मुंबईत सुरू असलेल्या प्रदर्शनात याबाबतचा एक खास स्टॉल लावण्यात आला आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून बाबासाहेब ननवरे यांचा सुतार कामाचा पिढीजात व्यवसाय आहे. बीड जिल्ह्यातील चिंचवण गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते सुतार काम करत आहेत. यामध्ये लाकडी देव्हारा, शेतीची अवजारे, पलंग, कपाट, घरगुती वस्तू बनवत असतात. मात्र, कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले. अश्यातच अनेकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. पण जर जिद्द आणि चिकाटी असेल तर तुम्ही आहात त्या परिस्थितीवर मात करून आपलं अस्तित्व सिद्ध करू शकतात. असंच काही बाबासाहेब यांनी करून दाखवलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ज्याठिकाणी अनेकांची कामे थांबली होती. नुकसान झालं होत. तिथे बाबासाहेब यांनी युक्ती लावून व्यवसाय टिकवून ठेवला आणि पिढीजात व्यवसाय एका वेगळ्या कल्पनेच्या आधारे अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा जिवंत ठेवला. अनेकांना कोरोनाचा फटका बसला मात्र बाबासाहेब यांनी आपल्या कलेचा योग्य वापर करून नफा कमवायला सुरुवात केली. लहान आकाराची बैलगाडी तयार केली कोरोना मध्ये आमचा पिढीजात व्यवसाय बंद होता. आम्ही सुतार काम करत होतो. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर जाता येत नव्हतं. अश्यावेळी घरात बसल्या बसल्या काय करायचं असा अनेकदा विचार पडायचा. हाताला काम नव्हतं यावेळी घरात असलेल्या लाकडापासून लहान आकाराची बैलगाडी तयार करण्याची कल्पना सुचली. लागडापासून बैलगाडी बनवायला सुरुवात केली आणि ही बैलगाडी विकल्या सुद्धा गेली. तेव्हा आणखी तयार केल्या त्यादेखील विक्री झाल्या त्यात सुधारणा केली. सजविण्यात आलं आणि इथून खऱ्या अर्थाने बैलगाडी तयार करण्याच्या व्यवसायाला चालना मिळाली, असं बाबासाहेब नंनवरे यांनी सांगितले.

    Success Story : लॉकडाऊनमध्ये सुचली कल्पना ‘या’ महिला बनवतात चक्क 21 प्रकारच्या शेवया, Video

     मंच उपलब्ध करून दिला गावातल्या गावात अश्या काही बैलगाड्यांची विक्री होत असे मात्र यावर घर चालविणे शक्य नव्हते. अश्यावेळी उमेद अभियानांतर्गत आमच्या सारख्या कारागिरांना मंच उपलब्ध करून दिला. याठिकाणी आमच्या कलेला वाव मिळतो. त्याच बरोबर आमच्या सोबत गावातील महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे, असंही त्यांनी सांगितले. काय आहे किंमत? या व्यवसायात आमच्या सोबत गावातील 20 महिला जोडल्या गेल्या आहेत. आम्ही बचतगटांच्या माध्यमातून या बैलगाड्या साजविण्याचे रंग देण्याचे काम करत असतो. तसेच महिन्याला 25 च्या जवळपास बैलगाड्यांची विक्री होते. साधारण 2000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत बैलगाडी आमच्या कडे उपलब्ध आहेत. या बैलगाडीचा वापर शक्यतो लग्नामध्ये रुखवत, हॉटेल मध्ये, घरात सजावटीसाठी, बैलगाडा शर्यत येथे पारितोषिक म्हणून असा याचा उपयोग केला जातो, असं अश्विनी बाबासाहेब नंनवरे यांनी सांगितले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: beed , Local18 , mumbai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात