लातूर, 13 ऑक्टोंबर : मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत राज्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या चोऱ्या होत असलेल्यांमध्ये 25 ते 35 या वयोगटातील वर्ग असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान लातूर येथे राजकमल अग्रवाल यांच्या कन्हैय्या नगरात असलेल्या बंगल्यावर काल(दि.12) पहाटे अज्ञात दरोडोखोरांनी दरोडा टाकला. हे दरोडेखोर 25 ते 30 वयोगटातील असल्याच बोलले जात आहे. तर लातूरमध्ये झालेल्या चोरीने मोठी खळबळ माजली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत असले तरी नागरिकांंमध्ये भितीचीचे वातावरण पसरले आहे.
यावेळी शस्त्राचा धाक दाखवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 2 कोटी 98 लाख 9 हजार 500 रुपयाचा ऐवज लुटला. या प्रकरणी आकाश राजकमल अग्रवाल (वय 32) यांच्या फिर्यादीवरुन विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात पाच अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. एवढी मोठी धाडसी चोरी झाल्याने लातूर शहरात याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान ही चोरी पूर्वनियोजीत कट रचून केल्याचेही बोलले जात होते.
हेही वाचा : शेतातील झाडाखाली उभा राहिली महिला; क्षणभरात अंगावर कोसळला मृत्यू, कधीही करू नका ही चूक
याबाबत माहिती अशी की, कातपूर रोड परिसरातील कन्हैय्या नगरातील अग्रवाल यांच्या बंगल्यात बुधवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पाच दरोडेखोर शिरले. त्यांच्या हातात त्यांनी राजकमल अग्रवाल यांना जागे करुन त्यांच्या गळ्याला चाकू लावला. हत्याराचा धाक दाखवत त्यांनी अग्रवाल त्यांच्या पत्नी मुलगा व अन्य सदस्यांचे मोबाईल काढून घेतले.
सोन्याचे दागिने, व रोख रक्कम 2 कोटी 25 लाख रुपये असा 2 कोटी 98 लाख 9 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटला. यानंतर अग्रवाल यांनी विवेकांनद चौकीत याबाबत तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा : वर्गमित्राकडून 20 वर्षांची विद्यार्थिनी झाली गर्भवती, अन् तिची रवानगी थेट तुरुंगात
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
अज्ञात दरोडेखोर हे 25 ते 30 या वयोगटातील असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या हातात शस्त्रे होती. अग्रवाल यांच्या बंगल्यात सीसीटीव्ही कॅमेरे असले तरी ते बंद होते. वॉचमनही होते त्यांनाही हे कसे कळाले नसेल यावरही शहरभर चर्चा सुरू होती. दरम्यान पोलीसांनी याबाबत तपास सुरू केला आहे. ही घटना घडल्यानंतर लातूर शहर परिसरात बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. दरम्यान या घटनेनंतर भितीचे वातावरण पसरले होते.
मुलांची पप्पी घेत वेगळीच दहशत
राजेश अग्रवाल यांच्या घरात पहाटे तीनच्या सुमारास पाच दरोडेखोर घुसले, त्यांनी आकाश अग्रवाल आणि कुटुंबीयांना पिस्टल कोयता चाकूचा धाक दाखविला. मात्र कोणालाही इजा केली नाही, उलट दोन लेकरांची पप्पी घेतली आणि घाबरु नका असे सांगितले. तसेच पतीच्या गळ्यातील लॉकेट देवाचे आहे हो, असं अर्जव करताच ताई घाबरु नका म्हणून त्यांनी ते लॉकेट सोडून इतर सोन्याचे दीड किलो दागिने आणि तब्बल दोन कोटी रुपय रोख रक्कम लंपास केली.