जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची 2 दिवसांपासून धडपड, पाहा VIDEO

भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची 2 दिवसांपासून धडपड, पाहा VIDEO

भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची 2 दिवसांपासून धडपड, पाहा VIDEO

Viral Video: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. याठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून एक कुत्रं आपल्या मालकाला पाहाण्यासाठी धडपड करत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रत्नागिरी, 25 जुलै: गेल्या पाच ते सहा दिवसात महाराष्ट्रात (Maharashtra) पावसाचं थैमान पाहायला मिळालं. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Rainfall in Maharashtra)अनेक ठिकाणी दरड कोसळली (Landslide) तर काही ठिकाणी पूराच्या घटना घडल्या. गेल्या तीन ते चार दिवसात राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 112 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 99 जण अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे गावात डोंगर खचून घरांवर दरड कोसळल्याची घटना देखील समोर आली आहे. तब्बल 17 तासानंतर या गावात मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 14 जणांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. पण याठिकाणी एक कुत्रं मागील दोन दिवसांपासून भर पावसात आपल्या मालकाला शोधत आहे. या कुत्र्याला NDRF च्या जवानांनी अनेकदा हाकलून लावण्याचा प्रयत्न केला आहे. पण हे कुत्रं पुन्हा पुन्हा घटनास्थळी आपल्या मालकाला शोधण्यासाठी येत आहे. हेही वाचा- गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवासी ट्रेनवर दरड कोसळली; भयावह दुर्घटना या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतं आहे. मालकाचं घर आणि मालक दिसत नसल्यानं हे कुत्रं सैरवैर झालं आहे. NDRF च्या एका जवानानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाल्यापासून हे कुत्रं याठिकाणी ठाण मांडून आहे. त्याच्या मालकाचं घरही इथेच होतं. पण आता अचानक याठिकाणी कोणीच दिसत नाहीये. त्यामुळे हे कुत्रं पुन्हा पुन्हा त्याच जागेवर येऊन उभा राहत आहे.

जाहिरात

हेही वाचा- LIVE: बिरमणी गावातील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं मागील काही तासांपासून खेड तालुक्यातील पोसरे- बौद्धवाडी याठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे पोसरे गावात शोककळा पसरली आहे. आज सकाळपासून मातीच्या ढिगाऱ्याखालून 9 मृतदेह काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 15 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले आहेत. अजूनही 2 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफ, सैन्य दल, शीघ्र कृतीदालाचे जवान गेल्या 24 तासंपासून बचावकार्य करत आहेत. मध्यरात्री 3 पोकलन मशीन पोसरे गावात दाखल झाल्यानं मदत कार्याला वेग आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात