मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साताऱ्याचे वीरपुत्र शहीद सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; पत्नीचा टाहो काळीज चिरणारा

साताऱ्याचे वीरपुत्र शहीद सुभेदार विजय शिंदे पंचत्वात विलीन; पत्नीचा टाहो काळीज चिरणारा

फोटो- सोशल मीडिया

फोटो- सोशल मीडिया

लडाखमधील तुरतुक सेक्टरमधील एका रस्ते अपघातात (Road Accident) आतापर्यंत भारतीय सैन्याच्या 7 जवान शहीद झाले होते. तर काही जवान गंभीर जखमी झाले.

मुंबई, 29 मे : विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे लडाखमध्ये (Ladakh) करताना शहीद झाले होते. त्यांच्यावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव गावात आल्यावर सर्वांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते. यावेळी आपल्या पतीचे पार्थिव पाहून त्यांच्या पत्नीने टाहो फोडला.

वातावरण अत्यंत शोकमय

लडाखमधील तुरतुक सेक्टरमधील एका रस्ते अपघातात (Road Accident) भारतीय सैन्याचे 7 जवान शहीद झाले होते. तर काही जवान गंभीर जखमी झाले. यात सातारा जिल्ह्यातील विसापूर खटाव येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच तालुक्यावर एकच शोककळा पसरली. शहीद सुभेदार विजय सर्जेराव शिंदे याचे पार्थिव गावामध्ये येताच सर्वांच्या डोळ्यांमधून अश्रू वाहत होते.

पत्नीने फोडला टाहो -

आपल्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव एकवटला. आपल्या पतीचे निधन झाल्याची बातमी माहित झाल्यापासून विजय शिंदे यांच्या पत्नी स्वत:ला सावरू शकत नाही आहेत. बापाचा चेहरा मुलांना पाहु द्या, म्हणत त्यांच्या पत्नीने परत एकदा टाहो फोडला. आपल्या पतीला उठा ना, अहो उठा ना, असे म्हणत त्यांनी टाहोच फोडला. यावेळी दृश्य काळीज चिरणारी होती.

शहीद जवान शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. फुलांचा वर्षाव करत शहीद शिंदे यांना गावकऱ्यांनी आपल्या या वीर सुपुत्राला निरोप दिला. जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी शहीद जवान विजय शिंदे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

हेही वाचा - लडाखमध्ये 26 जवान प्रवास करणाऱ्या सैन्याच्या गाडीला जबर अपघात; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

24 वर्ष लष्करात बजावली सेवा -

शहीत विजय सर्जेराव शिंदे हे 1998मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये लष्करी सेवेत भरती झाले होते. 24 वर्ष त्यांनी देशाची सेवा केली. या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी काम करून देशाचे संरक्षण केले. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे यांनीही लष्करात सेवा बजावली आहे. इतकेच नाही तर त्यांचे मोठे भाऊ प्रमोद शिंदे हेसुद्धा लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत.

First published:

Tags: Funeral, Indian army, Ladakh