Home /News /maharashtra /

Konkan Rain Update : धोका! समुद्र खवळणार, कोकणातील 60 गावांना सतर्कतेचा इशारा

Konkan Rain Update : धोका! समुद्र खवळणार, कोकणातील 60 गावांना सतर्कतेचा इशारा

(Maharashtra rain update) दरम्यान कोकण किनारपट्टीवर (Konkan coast heavy rain fall) जोरदार पाऊस होत असल्याने प्रशासनाने वेळीच पावले उचलण्यास सुरू केले आहे.

  मुंबई, 07 जुलै : मागच्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. (Maharashtra rain update) दरम्यान कोकण किनारपट्टीवर (Konkan coast heavy rain fall) जोरदार पाऊस होत असल्याने प्रशासनाने वेळीच पावले उचलण्यास सुरू केले आहे. कोकणात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत समुद्राला (Konkan sea) 14 वेळ उधाणाच्या मोठ्या लाटा येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. (imd alert) यामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील 60 गावे सागरी उधाणाच्या छायेत असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 13 ते 17 जुलै व 30 व 31 जुलै दरम्यान मोठ्या उधाणाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. (Konkan Rain Update)

  रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून समुद्र खवळलेला आहे. या पार्श्वभूमीवर  समुद्रालगतच्या गावांना, वस्त्यांना स्थानिक तहसील प्रशासनामार्फत नोटिसा दिल्या जातात. मात्र, किनारपट्टीवरील नागरिकांचा मच्छीमार व्यवसाय असल्यामुळे नोटीस देऊन हे नागरिक अन्यत्र जाण्यास उत्सुक नसतात.

  हे ही वाचा : Kolhapur Rain Update : 60 पेक्षा जास्त गावांचा थेट संपर्क तुटला, नागरिकांच्या स्थलांतराची तयारी

  यावर्षी संभाव्य सागरी उधाणांची शक्यता विचारात घेऊन हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्हा किनारपट्टीवरील 60 गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. यामध्ये देवबाग तारकर्ली निवती, वेळागर, तांबळडेग, विजयदुर्ग, धालवलीयासह अन्य मिळून 60 गावांचा समावेश आहे. तर रत्नागिरी जिल्हयातील गावखडी, हर्णे बंदर, कळंबादेवी, दाभोळे, गणपतीपुळे, मालगुंड, केळशी आंबोळगड, जैतापूर, नाटे आदी गावांचा समावेश आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास व त्याचवेळी समुद्राला उधाण आल्यास किनारपट्टी व खाडी लगतच्या गावांमध्ये, वस्तींमध्ये उधाणाचे पाणी घुसण्याचा धोका आहे.

  मुंबईत पावसाचा अलर्ट

  मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आज (गुरूवार) सकाळी देखील कायम आहे. पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये येत्या 3 ते 4 तास जोरदार पाऊस (Mumbai Rain Update) पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आज पहाटे साडेपाच पर्यंत कुलाबा वेधशाळेत 95.4 मिमी तर सांताक्रुझमध्ये 96.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मोठ्या घोषणा

  मुंबई-ठाण्यासह जवळच्या रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागात तीव्र ते अती तीव्र पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्याचप्रमाणे सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस आगामी काही तासांंमध्ये पडेल, असे हवामान विभागानं स्पष्ट केलं. नागरिकांना बाहेर पडण्यापूर्वी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही हवामान विभागानं दिली आहे

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Konkan, Monsoon, Rain fall, Rain flood, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या