मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Konkan Rain Alert : पाऊस इलो रे! कोकणात पुढचे चार दिवस पावसाचे धडामधूम, हवामान विभागाकडून orange alert

Konkan Rain Alert : पाऊस इलो रे! कोकणात पुढचे चार दिवस पावसाचे धडामधूम, हवामान विभागाकडून orange alert

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भात प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक पूर्व सूचना दिल्या आहेत. (Konkan Rain Alert)

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भात प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक पूर्व सूचना दिल्या आहेत. (Konkan Rain Alert)

रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भात प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक पूर्व सूचना दिल्या आहेत. (Konkan Rain Alert)

  • Published by:  Sandeep Shirguppe

रत्नागिरी 08 सप्टेंबर : रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भात प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक पूर्व सूचना दिल्या आहेत. (Konkan Rain Alert) या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात  09 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर 2022 या काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. याचबरोबर Orange Alert घोषीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी मार्फत करण्यात आल्या आहेत.

सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसाने नुकसान न होण्यासाठी प्रशासनाने काही मार्गदर्शक तत्वे दिली आहेत.

1) मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.

हे ही वाचा : बाप्पाच्या निरोपाला पाऊस सर्जीकल स्ट्राईक करणार ‘या’ जिल्ह्यात Yellow Alert

2) अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.

3) घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.

4) पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

5) मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी खालील प्रमाणे जिल्हा व तालुका नियंत्रण कक्षास संपर्क साधावा. १. जिल्हा नियंत्रण कक्ष - 02352- 226248/222233, 2. पोलीस नियंत्रण कक्ष- 02352-222222,3. राजापूर तहसील कार्यालय - 02353-222027 4. लांजा तहसील कार्यालय - 02351- 295024 5. रत्नागिरी तहसील कार्यालय - 02325-223127 ६. संगमेश्वर तहसील कार्यालय - 02352-260024, 7. चिपळूण तहसील कार्यालय - 02355 - 295004 ८. गुहागर तहसील कार्यालय - 02359 - 240237, 9. खेड तहसील कार्यालय - 02356 - 263031 १०. दापोली तहसील कार्यालय - 02358- 282036 11. मंडणगड तहसील कार्यालय 02350-225236

6) हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdimumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.

7) कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी. किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (02362)228847 किंवा टोल फ्री 1077 या क्रमांकावर संपर्क साधून बातमीची खातरजमा करावी.

8) अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे, घर किंवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सतर्क राहावे.

9) आपत्कालीन स्थिती उद्भवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र या ठिकाणी आपण राहत असल्यास प्रशासनाकडून मिळणा-या सूचनांचे पालन करावे.

हे ही वाचा : कार रिव्हर्स घेताना तलावात बुडाली, पोहता येत नसताना प्रचंड प्रयत्न केला पण नियतीला मान्य नव्हतं

10) पुरप्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

11) जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, पूल इ. ठिकाणी जावू नये.

12) अतिवृष्टी होत असताना कोणीही समुद्रात, नदी-नाले इ. ठिकाणी जावू नये.

13) अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी.

14) पुराच्या पाण्यात समुद्रात नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपत्कालीन स्थितीत सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांनी केले आहे.

First published:

Tags: Rain fall, Rain flood, Ratnagiri, Weather update, Weather warnings

पुढील बातम्या