मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तुम्ही कधी मोंगा-पोपटी पार्टी केलीय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्य

तुम्ही कधी मोंगा-पोपटी पार्टी केलीय का? जाणून घ्या खास वैशिष्ट्य

 मडक्याच्या चारही बाजूने आग लावून, निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यातल सर्व चिकन आणि इतर भाज्या व्यवस्थित शिजवल्या जातात

मडक्याच्या चारही बाजूने आग लावून, निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यातल सर्व चिकन आणि इतर भाज्या व्यवस्थित शिजवल्या जातात

मडक्याच्या चारही बाजूने आग लावून, निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यातल सर्व चिकन आणि इतर भाज्या व्यवस्थित शिजवल्या जातात

गुहागर, 09 जानेवारी : कोकणात कडाक्याची थंडी पडायला लागली की इथल्या तरुणाईला वेध लागतात ते शेतातल्या मोंगा पार्टीचे. अनेकजण याला पोपटी म्हणून देखील संबोधतात. पोपटी किंवा मोंगा हा प्रकार गेल्या 4 /5 वर्षात जास्तच लोकप्रिय झालाय.

काय आहे मोंगा/ पोपटीचा नेमका प्रकार?

एक मोठं मडकं घेतलं जातं त्यात अंडी, कांदे,लसूण, बटाटे, चिकन, मासे जे काही हवं ते (खाण्याच्या सर्व फळभाज्या) खचून भरलं जाते. त्यापूर्वी मडक्यात जंगली पाला टाकला जातो ज्याला भांभुर्डीचा पाला म्हटलं जातं (मडक्याला आगीचा शेक लागून ते लगेच फुटू नये म्हणून हा पाला आतल्या बाजूंने लावला जातो. या पाल्याचा स्वाद पावट्याच्या शेंगा आणि चिकनमध्ये मिसळल्यामुळे ते आणखी स्वादिष्ट बनत असं म्हणतात) तयार केलेलं सर्व मिश्रण मडक्याच्या आत व्यवस्थित लावलं जातं आणि मोठ्या प्रमाणात ओवा टाकून मडक्याचे तोंड बंद करून ते उलट करून एका खड्यात ठेवलं जातं.

मडक्याच्या चारही बाजूने आग लावून, निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यातल सर्व चिकन आणि इतर भाज्या व्यवस्थित शिजवल्या जातात. जवळपास अर्ध्या तासात हे सगळं शिजलं की, एका मोठ्या केळीच्या पानावर मडकं पालथी घालून त्यावर ताव मारला जातो. वाफेवर शिजल्यामुळे यातल्या भाज्या चिकन आणि पावट्याच्या शेंगा अत्यंत चवदार बनतात आणि म्हणूनच कोकणात आलात की रायगडपासून ते तळ कोकणापर्यंत तुम्हाला पोपटी किंवा मोंगा पार्टीचा आस्वाद घेता येऊ शकतो. विशेष करून थंडीच्या दिवसात अश्या पार्ट्या मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी करताना दिसतात.

पोपटी ही हल्ली जरी पार्टी/मेजवानी म्हणून केली जात असली, तरी पूर्वी शेताची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासुन वाचण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी विरंगुळा म्हणून हे प्रकार करत असे. शेतात ज्या भाज्या, शेंगा मिळतात, रानटी उगवलेला भांबुर्डीचा पाला आणि घरून फक्त मीठ-मसाला आणून हे शेतकरी पोपटी करतात.

ही पिढ्यानं पिढ्या चाललेली कोकणी परंपरा कुटुंब, पाहूणे, मित्र अशा सर्वांना बोलावून अजुनही साजरी केली जाते. पोपटी मडक्यात भरून ती शिजेपर्यंत अर्धा-पाऊण तास  वेळ  लागतो. यादरम्यान धमाल गप्पा रंगतात, जुन्या आठवणी, गाण्यांच्या घरगुती मैफिली यांची रंगत औरच असते.

जे मांसाहार करत नाहीत असे लोकं शाकाहारी पोपटी देखील त्याच पद्धतीने बनवतात.

First published:
top videos

    Tags: Kokan, Konkan, Monga party