जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / खासबाग मैदानात घुमणार शड्डूचा आवाज, कोल्हापूरकरांना मिळणार कुस्तीची पर्वणी

खासबाग मैदानात घुमणार शड्डूचा आवाज, कोल्हापूरकरांना मिळणार कुस्तीची पर्वणी

खासबाग मैदानात घुमणार शड्डूचा आवाज, कोल्हापूरकरांना मिळणार कुस्तीची पर्वणी

कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुध्द आयोजित करण्यात आले आहे.

  • -MIN READ Local18 Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 04 जानेवारी : कोल्हापूर चे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मल्लयुध्द आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूरात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने हे कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात शड्डूचा आवाज घुमणार आहे. कुस्ती शौकीनांना या कुस्ती मैदानाच्या निमित्ताने चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. शनिवार, 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात 1 ते 5 नंबरच्या मोठया कुस्त्यांबरोबर 107 कुस्त्या लावण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या मैदानामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा चांदीची गदा देवून अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती तालीम संघाचे अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी दिली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    कशा होतील लढती ? या मैदानामध्ये 1 नंबरच्या लढतीसाठी कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा मल्ल महान भारत केसरी पै. सिकंदर शेख विरुध्द पंजाबचा मल्ला हिंदू केसरी, भारत केसरी पै. गौरव मच्छीवाला यांच्यामध्ये लढत होणार आहे. यामध्ये विजेत्या मल्लाला चांदीची गदा देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. 2 नंबरच्या लढतीसाठी गंगावेश तालमीचा उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर विरुध्द पंजाब मधील गुरुभवानी आखाडयाचा मल्ल पै. सतनाम सिंग यांच्यात लढत होणार आहे. खासबाग मैदानात घुमणार शड्डूचा आवाज प्रदीर्घ काळानंतर या कुस्त्यांच्या निमित्ताने खासबाग मैदानात इर्षेने शड्डू घुमणार आहे. त्यामुळे खासबाग कुस्ती मैदान आखाडयात नविन लाल माती घालण्यात आली आहे. त्याचबरोबर महानगरपालिके कडून संपूर्ण मैदानाची स्वच्छता आणि डागडुगी देखील करण्यात आली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात