मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली तरुणींच्या शरीराचा सौदा; कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली तरुणींच्या शरीराचा सौदा; कोल्हापुरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Crime in Kolhapur: शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू होता.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 22 मार्च: अलीकडेच काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील (Kolhapur) ताराराणी चौकानजीक असणाऱ्या निंबाळकर कॉलनीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा शाहूपुरी पोलिसांनी पर्दाफाश (Sex racket exposed) केला होता. संबंधित ठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी एक महिलेसह दोघांना अटक (2 Accused arrested) केली होती. संबंधित दोघे आरोपी मसाज पार्लरच्या (massage parlor)नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत होते. ही घटना ताजी असताना आता शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाची आणखी एक घटना समोर आली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. तर वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा-पाषाण टेकडीवर तरुण-तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार, पुणेकरांना सावध करणारी घटना

चित्रकला कुरणे असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. ती हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी चेंबर्सच्या दुसऱ्या मजल्यावर दृष्टी आयुर्वेद पंचकर्म अँड बॉडी केअर सेंटर नावाचं मसाज पार्लर आहे. पण याठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. संबंधित माहितीच्या आधारावर शाहनिशा केल्यानंतर सोमवारी सायंकाळी पोलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली.

हेही वाचा-वहिनीसोबत केलेल्या कृत्याचा उगवला सूड;दिराने गावातील तरुणाचा केला सिनेस्टाईल खून

दृष्टी आयुर्वेद पंचकर्म अँड बॉडी केअर सेंटर केलेल्या छापेमारीत पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मुख्य महिला आरोपी चित्रकला कुरणे हिला अटक केली आहे. तसेच वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या तीन तरुणींची देखील पोलिसांनी सुटका केली आहे. गेल्या महिन्याभरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेला हा दुसरा प्रकार समोर आला आहे. महिनाभरापूर्वी कोल्हापुरातील (Kolhapur) ताराराणी चौकानजीक असणाऱ्या निंबाळकर कॉलनीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश शाहूपुरी पोलिसांनी केला होता.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Sex racket