कोल्हापूर, 02 मार्च : कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांची काँग्रेस गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आज (दि.02) सभागृहात त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. याचबरोबर विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटलांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक काँग्रेस आमदार निवडून आणण्यामध्ये सतेज पाटील यांचा सर्वाधिक वाटा आहे. तसेच कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही आहेत.
काँग्रेस पक्षाने आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. आता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे, या पदालाही न्याय देण्याचा प्रयत्न करु, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रातील कॅम्पेन तसेच यात्रा राज्यात पोहोचल्यानंतर त्यांनी दाखवलेलं शक्तीप्रदर्शनही चांगलेच चर्चेत होते.
भाजपचा बुरूज ढासळला, धंगेकर कसे ठरले जाएंट किलर? कसब्याची Inside Storyथोरात विरूद्ध पटोले वादात थोरातांचा राजीनामा
गेल्या काही दिवसांपासून तांबे-थोरात विरुद्ध नाना पटोले असा संघर्ष काँग्रेसमध्ये पाहायला मिळाला, त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ नेते पदाचा राजीनामा दिला होता.
नाशिक मतदारसंघात बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे निवडून आले होते. काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना तिकीट दिलं होतं. पण त्यांनी फॉर्म भरलाच नाही. अखेर सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सत्यजीत निवडून आले. पण यानिमित्ताने थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता.
पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असं थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवलं होतं. माजी मंत्री आणि प्रदीर्घ अनुभव असलेलेया थोरात यांनी विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिल्याने राज्य काँग्रेसमधील कलह समोर आला आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती नसल्याचं सांगितलं.