ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
कोल्हापूर, 10 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या (Coronavirus) संख्येत आता दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध (Restrictions in Maharashtra) लवकरच शिथिल करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर असलेल्या आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना निर्बंध शिथिलतेवर विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाराष्ट्र मास्क मुक्त (Mask Free Maharashtra) होणार का? यावरही त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. (Rajesh Tope reaction on Mask Free Maharashtra)
महाराष्ट्र मास्क मुक्त होणार?
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आज लगेचच महाराष्ट्र आणि देशात मास्कमुक्ती केली पाहिजे असं अजिबात नाहीये. पण यूके ने या संदर्भातील निर्णय का घेतला? त्याच्यामागचं शास्त्र काय आहे? पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केल आहे. हे का आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. या संदर्भातील सर्व माहिती आपण संकलित करत आहोत. इतक्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात तात्काळ मास्कमुक्ती करुन कुठलंही संकट ओढवायचं नाहीये. त्यामुळे तुर्तास मास्कमुक्ती शक्य नाहीये मात्र, निर्बंध शिथिल केले जातील. सिनेमागृह, नाट्यगृह यांच्यातील 50 टक्के क्षमतेचे निर्बंध शिथिल करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल.
महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभरात कोरोनाच पसरल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलं. यावर भाष्य करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेन काम केलं आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी तर यासाठी तिजोरी रिकामी केली. कोरोना पेशंटला प्राधान्य दिलं, अनेक चांगल्या संस्थानी राज्यच कौतुक केलं आहे. आम्ही आमच्या परीने जमेल तेवढ काम केलं आहे.
वाचा : नागपुरात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, नितीन गडकरींच्या घराबाहेर राडा, LIVE VIDEO
घराजवळ उपचार संकल्पना
ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन आणि एमआरआय मशीन उपलब्ध करून देणार आहोत. 50 पासून 100 खाटांपर्यंतच्या रुग्णालयात या सुविधा देणार आहोत. घराजवळ उपचार ही संकल्पना घेऊन काम करत आहोत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
द्राक्ष उत्पादकांसाठी वाईन विक्रीचा निर्णय
राज्य सरकारने सुपरमार्केट आणि जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, कोणतीही गोष्ट लिमिटेड घेण्याची गरज, वाईन अँटी ऑक्सिडंट असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. द्राक्ष उत्पादकांसाठी हा निर्णय घेतला आहे, दारूला प्रोत्साहन देण्याच्या हेतू नाही.
वाचा : भयंकर! किरकोळ वादातून तरुणाला उकळत्या चुन्यात ढकलले; साताऱ्यातील घटनेने खळबळ
महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे Unlock
कोरोनाची लाट ओसरल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने आधीच जानेवारी महिन्यात लागू केलेले निर्बंध हटवले आहे. पण आता फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्र पूर्णपणे अनलॉक केला जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (9 फेब्रुवारी 2022) दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाची लाट ओसरत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. जानेवारी महिन्यात जितकी संख्या वाढली होती, ती आता कमी झाली आहे.
कोरोनाबाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्यामुळे नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे कल राहिलं, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Face Mask, Kolhapur, Rajesh tope