जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Ravikant Tupkar Buldana : रविकांत तुपकरांचे आंदोलन म्हणजे नौटंकीपणा, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Ravikant Tupkar Buldana : रविकांत तुपकरांचे आंदोलन म्हणजे नौटंकीपणा, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

Ravikant Tupkar Buldana : रविकांत तुपकरांचे आंदोलन म्हणजे नौटंकीपणा, गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य

पीक विम्यासाठी सुरू असलेल्या रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

जळगाव, 12 फेब्रुवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी काल (दि.12) बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांच्या वेशात येत स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. दरम्यान या घटनेवरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. या आंदोलनाला गुलाबराव पाटील यांनी नौटंकी आंदोलन सुरू असल्याचे म्हणाले आहेत.

जाहिरात

या प्रकारावर राज्यभरातून सरकारवर टीका होत आहे. तर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे उपोषणाला बसले आहेत. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे. आंदोलनाचे अनेक मार्ग आहे. आपणही आंदोलनं केली. मात्र हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही. अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. एका मंत्र्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अशी प्रतिक्रिया देणं कितपत योग्य आहे, अशी टीका आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर होत आहे.

हे ही वाचा :  तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की…; कोश्यारींच्या राजीनाम्यावर खैरेंचा मोठा गौप्यस्फोट

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली आहे. लाठीमार करणं चुकीचा आहे, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन आहे. हे मला पसंत नाही. आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत. अतिरेक करणं चुकीचा आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

जाहिरात

रविकांत तुपकर का उतरले आहेत मैदानात?

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांनी टोकाची भूमिका घेत शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंव्हा AIC पिकविमा कंपनीच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले होते.

मात्र नेमके बुलडाण्यात की मुंबईत कुठे आत्मदहन करणार ? हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले होते. एकतर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जगू द्या, नाहीतर आम्हाला आत्मदहन करू द्या. तेही करू देणार नसाल तर पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या घालून आम्हाला ठार करा. अशी भूमिका या आंदोलनाबाबत तुपकरानी मांडली आहे.

जाहिरात

हे ही वाचा : Beed : पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video

दरम्यान, तुपकरांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. तसेच पोलिसांनी तुपकरांना नोटीसदेखील बजावली होती. मात्र, मागील तीन दिवसांपासून ते भूमिगत होते. त्यानंतर आज तुपकरांनी पोलिसांच्या वेशात बुलडाणा जिल्हाधिकारी परिसरात दाखल होते स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात