जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधींचं निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधींचं निधन, कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वास

अरुण गांधी यांचं निधन

अरुण गांधी यांचं निधन

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 2 मे :  महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं आज कोल्हापुरात निधन झालं, वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं आहे. अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पूत्र तुषार गांधी यांनी दिली आहे. अरुण गांधी हे लेखक होते तसेच ते सामाजिक कार्यकर्ते देखील होते. अल्पशा आजारानं आज त्यांची प्राणज्योत मालावली. अरुण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू आणि त्यांचे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. अरुण गांधी यांचा जन्म 14 एप्रिल 1934 ला दक्षिण आफ्रिकेतील डर्बन मध्ये झाला. मणिलाल गांधी म्हणजेच अरुण गांधी यांचे वडील इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते तर त्यांची आई या इंडियन ओपिनियनच्या प्रकाशक होत्या. अरुण गांधी यांनी सुरुवातीपासूनच सामाजिक व राजकीय प्रश्नावर कार्य केले. अरुण गांधी हे लेखक देखील होते. द गिफ्ट ऑफ अँगल: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रँड फादर हे पुस्तक चांगलं गाजलं. अरुण गांधी हे आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते. त्यांनी आपल्या आयुष्याची बरिच वर्ष अमेरिकेत घालावली. अखेर आज वयाच्या 89 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालावली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात