मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापूर : ग्रामीण भागातील पोरीची गगनभरारी, वर्षाला तब्बल 60 लाखांचं पॅकेज मिळालं

कोल्हापूर : ग्रामीण भागातील पोरीची गगनभरारी, वर्षाला तब्बल 60 लाखांचं पॅकेज मिळालं

अनामिकाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

अनामिकाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

अनामिकाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 13 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुलीला जगविख्यात adobe कंपनीने तब्बल 60 लाखाचे वार्षिक पॅकेज दिले आहे. कॉम्प्युटर इंजिनियरचे शिक्षण घेत असतानाच तिला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील टॅलेंट पुढे आले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कायमस्वरूपी नोकरी -

कोल्हापूरच्या सोनाळी या छोट्याशा गावातली अनामिका डकरे ही आता जगविख्यात adobe कंपनीत टेक्निकल ऑफिसर पदावर कार्यरत असणार आहे. तिच्यातले टॅलेंट पाहून कंपनीने तिला वर्षाला तब्बल 60 लाखांची ऑफर दिली आहे. वडील शिक्षक तर आई गृहिणी अशा कुटुंबातून ती पुढे आली. अनामिका डकरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.

अनामिकाने कॉम्प्युटर इंजनिअरिंग क्षेत्रात आपला डंका कायम ठेवला आहे. शिक्षण घेत असतानाच तिला adob कंपनीने इंटर्नशिपची संधी देत महिन्याला एक लाखाचे विद्यावेतन दिले. ही इंटर्नशिप संपताच तिला 60 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर कायमस्वरूपी नेमणूक दिली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला मिळालेली ही सर्वात मोठी ऑफर आहे. त्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांचे टॅलेंटही आता जगभर पोहोचले आहे. तिच्या या यशाबद्दल कॉलेजचे ट्रस्टी, माजी मंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. तर कॉलेजच्या प्राचार्यांनी तिच्याविषयी अभिमान व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Shivaji University : शिवाजी विद्यापिठातील 36 हजार विद्यार्थ्यांचे बदलले निकाल, स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेला यश

अनामिकाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरले आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले आहेत.

First published:

Tags: Kolhapur, Success story