जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News : पावसामुळे राऊतवाडी धबधबा झाला हाऊसफुल, पण यंदापासून तिकीटाविना नो एंट्री PHOTOS

Kolhapur News : पावसामुळे राऊतवाडी धबधबा झाला हाऊसफुल, पण यंदापासून तिकीटाविना नो एंट्री PHOTOS

कोल्हापुरात असणाऱ्या धबधब्यांना शेकडो पर्यटक पावसाळ्यात भेट देत असतात. यापैकीच एक राऊतवाडी धबधबा एक आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी थंड हवेची ठिकाणे, गड किल्ले, डोंगरदऱ्या अशी अनेक ठिकाणे आहेत. मात्र कोल्हापुरात असणाऱ्या धबधब्यांना देखील शेकडो पर्यटक पावसाळ्यात भेट देत असतात.

राऊतवाडी धबधबा हा कोल्हापूर जिल्ह्यात निसर्ग सौंदर्य आणि जैव विविधतेने नटलेल्या राधानगरी तालुक्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी स्वच्छंदी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी दूरवरून येत असतात.

हा धबधबा कोल्हापूर शहरापासून 55 किलोमीटर, तर राधानगरीमधून फक्त 6.5 किलोमीटर अंतरावर आहे. जवळपास दीडशे फूट उंचीवरून पडणारे जलप्रपात पाहून मन थक्क होऊन जाते.

 यंदाच्या पावसाळ्यात हा राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाल्याने मोठ्या प्रमाणावर पर्यटक राऊतवाडीला भेट देत आहेत. तर दरवर्षी मोफत पाहता येणाऱ्या या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांना यंदा तिकीट आकारणी केली जाणार आहे.

धबधब्याच्या ठिकाणी स्वागत कमान, पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम्स, स्वछतागृह, वनकर्मचारी आणि पोलिसांसाठी चौकी तसेच संरक्षक कठडा आदी विकासकामे करण्यात आलेली आहेत.

त्यामुळे या वर्षी पहील्यांदाच राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी ग्राम परिस्थिती विकास समितीमार्फत लहान मुलांना 5 रुपये आणि महिला आणि पुरुष यांना 10 रुपये माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

तसेच येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांच्या पार्किंगची सोय देखील करण्यात आली असून त्यासाठी मोटारसायकल 10 रुपये आणि चारचाकी वाहनास 20 रुपये आकारण्यात येत आहेत. पोलिस चौकी उभारल्यामुळे पोलिस आणि वनकर्मचाऱ्यांची हुल्लडबाज तरुणांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

 त्यामुळे आता पर्यटकांना राऊतवाडी धबधब्यावर नाममात्र तिकीट काढून विविध सुविधांचा आनंद उपभोगता येणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात