साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 27 फेब्रुवारी : मोठमोठे महानगर असूद्यात किंवा नाहीतर छोटेसे खेडेगाव कचऱ्याची समस्या ही सर्वदूर पसरलेली आहे. रोज खरतर सुका आणि ओला कचरा वेगवेगळे गोळा करुन त्याची विल्हेवाट लावली जाणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व कचरा एकत्रित जमा झाल्याने अशा कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यास वेळ लागतो. यावरच आता नवीन एक तंत्रज्ञान भारी पडत आहे. कोल्हापूर च्या विद्याधर कुरतडकर हे एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. फक्त एका महिनाभराच्या कालावधीत घनकचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती कशी करता येईल, याबाबतचे तंत्र त्यांनी समजून घेतले. सध्या ते या तंत्राबाबत जनजागृती आणि या तंत्राचा प्रसार विविध जिल्हा परिषदांच्या मार्फत ग्रामीण स्तरावर करत आहेत.
घनकचऱ्यापासून मुक्ती कशी मिळेल याबाबत प्रयत्न आम्ही करत असतो. खरंतर ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा ठेवला पाहिजे. परंतु तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच ठिकाणी तो एकत्रितरित्या साठविला जातो. अशा कचऱ्यावर कल्चर बेस ट्रिटमेंट करून आपण सेंद्रिय खताची निर्मिती 30 दिवसांत करतो. त्यामध्ये जरी प्लास्टिक असले. तरी देखील बाकीच्या घटकांवर प्रक्रियेद्वारे कचऱ्याचे विघटन करून त्यातले प्लास्टिक वेगळे काढले जाते. त्या प्लास्टिकची रिसायकलिंग मार्फत कशी विल्हेवाट लावता येते, या मिश्र कचऱ्यातील कुजणाऱ्या कचऱ्यापासून कमीत कमी दिवसात सेंद्रिय खत निर्मिती, याबाबत आम्ही या प्रक्रियेत काम करत असतो, असे कुरतडकर यांनी सांगितले. कसा बनवला जातो सेंद्रिय खत? जैविक पद्धतीने सेंद्रिय खत 30 दिवसात घरीच बनवण्यासाठी पहिलाच तयार बेड किंवा नवीन बेड तयार करून घेतला जातो. उपलब्ध असलेला कचरा एकत्रित गोळा करून त्यावर कल्चर ट्रिटमेंट दिली जाते. 30 दिवसांनी सर्व एकत्रित रित्या मिसळून घेतले जाते. हा कचरा सुकू न देता त्यावर दर 2 ते 3 दिवसांनी गरजेनुसार पाणी शिंपडून त्याची आर्द्रता टिकवून ठेवली जाते. मात्र, जैविक घटकांची फवारणी ही एकदाच करायची आहे. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांन हे वाळेलेले मिश्रण व्यवस्थित चाळून घेतले जाते. त्यातून सेंद्रिय खत वेगळे मिळते.
आता घाला गायीच्या शेणापासून बनवलेली कोल्हापुरी चप्पल, आरोग्यालाही आहेत फायदे! Video
अशा बऱ्याच कंपन्या देतात सेवा सध्या अशा प्रकारे सुक्या आणि ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रत्येकाचे काही ना काही गुणदोष आहेत. मात्र, एकूणच या अशा कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावली गेली, तर आपला समाज आणि परिसर स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होण्याची शक्यता आहे.