जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Viral Video : जगात भारी, कोल्हापुरी; बोहल्यावरून थेट पोहोचले पंचगंगेत जलपर्णी काढायला

Viral Video : जगात भारी, कोल्हापुरी; बोहल्यावरून थेट पोहोचले पंचगंगेत जलपर्णी काढायला

नवदाम्पत्य उतरले पंचगंगेत जलपर्णी काढण्यासाठी

नवदाम्पत्य उतरले पंचगंगेत जलपर्णी काढण्यासाठी

सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र लग्नाची धुमाकूळ पहायला मिळत आहे. अनेक हटके लग्नांची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर, 15 जून : सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. सर्वत्र लग्नाची धुमाकूळ पहायला मिळत आहे. अनेक हटके लग्नांची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पहायला मिळतेय. अनेक वर वधू आपलं लग्न खास व्हावं यासाठी खूप मेहनत घेतात. लग्नामध्ये केलेल्या हटके गोष्टींमुळे वधू वर चर्चेत आलेले पहायला मिळतात. असंच एक नवदाप्तत्य सध्या जोरदार चर्चेत आलं आहे. लग्न होताच त्यांनी केलेल्या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. इचलकरंजी येथील नवदाप्तत्यानं लग्न होताच इचलकरंजीची जीवनवाहिनी असणारी पंचगंगा नदीत पोहोचले. गेले कित्येक दिवसांपासून ही नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. नवदाम्पत्यांनी तेथे जाऊन जलपर्णी काढली. या नव्या जोडप्यांच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

इचलकरंजी ची जिवनवाहिनी असणारी पंचगंगा नदी ही गेले अनेक दिवस जलपर्णीचा विळख्यात अडकली आहे. त्यामुळे माणुसकी फाउंडेशनने इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहकार्याने एकच ध्यास जलपर्णीचा ऱ्हास हे कार्य हाती घेतलं आहे. मी उतरणार माझ्या पंचगंगा मातेसाठी, मी उतरणार माझ्या उद्याच्या पिढीसाठी… ही संकल्पना घेऊन माणुसकी फाउंडेशनने पंचगंगा नदी जलपर्णी मुक्त करण्याचा निश्चय केलाय. त्याप्रमाणे गेले 60 पेक्षा जास्त दिवस माणुसकी फाउंडेशनची टिम त्याचे संस्थापक श्री.रवी जावळे यांच्या नेतृत्वाखाली इचलकरंजी महापालिकेच्या सकऱ्याने पंचगंगा केंदाळ मुक्तीसाठी झटत आहेत.

जाहिरात

दरम्यान, माणुसकी फाउंडेशनचे सदस्य श्री. कृष्णा इंगळे यांचा विवाह 13 जून 2023 रोजी पार पडला. विवाह विधी 10 जून पासूनच श्री.कृष्णा यांना केंदाळमुक्तीच्या मोहिमेसाठी जाता आले नाही. पण पूर्ण आपली पंचगंगा पूर्ण केंदाळमुक्त झाली नाही व 3 दिवस आपल्याला जात आले नाही याची हुरहुर श्री.कृष्णा यांच्या मनाला लागून राहिली होती. त्यावेळीच त्यांनी मनात निश्चित केले की लग्न झाल्या झाल्या सर्वप्रथम पंचगंगा नदीवर जाऊन खारीचा वाटा म्हणून आपल्या नववधूसह शक्य होईल तेव्हडे केंदाळ काढायचंच. मंगळवारी त्यांचा 13 जून रोजी विवाह संपन्न झाल्या झाल्या लगेच सर्वप्रथम श्री.वरदविनायक गणपती मंदिर येथे श्री.गणरायाचं आशिर्वाद घेतल्यावर आपल्या नववधूला हा आपला मानस त्यांनी सांगितला. नववधू सौ. शिवानी यांनीदेखील कोणतेही आढेवेढे न घेतला आपल्या साथीदाराला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार दोघांनी पंचगंगा नदीपात्र येथे येऊन जलपर्णी काढली. श्री. कृष्णा व सौ. शिवानी यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात