जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ब्रेकिंग! कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

ब्रेकिंग! कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

ब्रेकिंग! कोल्हापुरातील कणेरी मठावर कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायींचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे.

  • -MIN READ Kolhapur,Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे (कोल्हापूर), 24 फेब्रुवारी : कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या 4 दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे शिळे अन्न खायला घातल्याने 52 गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ इथला हा प्रकार आहे. अचानक घडलेल्या प्रकाराने खळबळ कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. अशातच ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  याचबरोबर अनेक गायींना विषबाधा झाल्याचे समजते आहे. यातील अद्यापही 30 गायींवर उपचार सुरू आहेत.

जाहिरात

देशी गायींच्या स्पर्धांचेही होते आयोजन श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर यांचे अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होईल, अशी माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी दिली. प्रदर्शनामुळे देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन व संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार असल्याचीही यामध्ये माहिती देण्यात आली. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असूनही तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात प्रथमच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. प्रदर्शनाबरोबर प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा देखील ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी 69 लाखांची बक्षिसे देण्यात येतील. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना 21 हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: food , kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात