जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News : शेतकऱ्यांनो, पावसामध्ये जनावरसह शेतीची अशी घ्या काळजी, या पिकांची करा पेरणी, VIDEO

Kolhapur News : शेतकऱ्यांनो, पावसामध्ये जनावरसह शेतीची अशी घ्या काळजी, या पिकांची करा पेरणी, VIDEO

Kolhapur News : शेतकऱ्यांनो, पावसामध्ये जनावरसह शेतीची अशी घ्या काळजी, या पिकांची करा पेरणी, VIDEO

पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी कोल्हापूर, 24 जून : साधारण जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस पडत असतो. मात्र यंदा महिना संपत आला, तरी देखील पावसाच्या अगदी तुरळक सरी बरसल्या आहेत. त्यामुळे शेतकरी राजा चिंतातुर झाला आहे. दरम्यान पुढच्या काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या काळात घ्यायची काळजी याबाबत आणि काही सूचनाही कोल्हापुरच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना करण्यात आल्या आहेत. कसे असेल हवामान? प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये दिनांक 24 ते 28 जून दरम्यान कमाल तापमान अनुक्रमे 29° ते 33°, 34° ते 36° आणि 28° ते 36° तसेच किमान तापमान हे अनुक्रमे 20° ते 24°, 24° ते 27°, 19° ते 20° सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 19 किमी पर्यंत, 22 ते 25 किमी आणि 18 ते 20 किमी दरम्यान राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दिनांक 24 ते 28 जून दरम्यान कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या, तर घाटमाथ्यासह बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बंधूनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी अशी घ्या काळजी शेतकरी बांधवांनी मेघ गर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी:- 1) पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध असल्यासच रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात करावी. 2) मेघ गर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडू नयेत, म्हणून काठी/बांबूच्या साहाय्याने आधार द्यावा. 3) शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली थांबणे टाळावे. 4) जनावरे तलाव, नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील, तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. 5) जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूपासून लांब बांधावीत 6) वाहने झाडाखाली उभी करू नयेत. 7) काढणी केलेला शेतीमाल प्लास्टिकच्या शीटने झाकावा. 8) विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळावा. 9) जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये. या पिकांची घ्या काळजी भात - सुधारित/संकरीत वाणाचे बियाणे शासकीय यंत्रणेकडून अथवा कृषि विद्यापिठाच्या विक्री केंद्राकडून खरेदी करावे. खरीप हंगामामध्ये भाताची लागवड करण्यासाठी रोपवाटिका तयार करणेकारिता गादी वाफे तयार करून घ्यावेत. पेरणीसाठी 1 मी. रुंदीचे 15 सेमी उंचीचे आणि आवश्यकतेनुसार लांबीचे गादीवाफे तयार करावेत. हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीसाठी 10 गुंठे क्षेत्रावरील रोपवाटिका पुरेशी होते. तर वाफे तयार करताना गुंठा क्षेत्रास 250 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खताबरोबर 500 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद आणि  500 ग्रॅम पालाश हि खते चांगल्या प्रकारे मातीत मिसळावीत. तसेच भात लागवडीसाठी पुढील वाणांची निवड करावी :- • हळवा : कर्जत-184, रत्नागिरी-1, कर्जत-4, फुले राधा• निमगरवा : फुले समृद्धी • गरवा : रत्नागिरी-2, कर्जत-2 • सुवासिक वाण : बासमती 370 इंद्रायणी, भोगावती, सुगंधा • संकरीत : सह्याद्री-1, सह्याद्री-4, सह्याद्री-5 पाण्याचा खात्रीशीर स्रोत उपलब्ध असल्यासच भात रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात करावी. खरीप ज्वारी - खरीप हंगामध्ये ज्वारी पिकाची पेरणीसाठी पुढील वाणांची उपलब्धता करून घ्यावी. • संकरीत वाण : सी.एस.एच. - 5, सी.एस.एच.- 9, सी.एस.एच. - 13, सी. एस. एच. - 14 • सुधारित वाण : एस.पी. व्ही. 462, सी.एस.व्ही. - 13, सी.एस.व्ही. - 15, पी.व्ही.के. - 801, • गोड ज्वारी : एस.एस.व्ही. - 84, सी.एस.व्ही. - 24, फुले वसुंधरा (संकरीत) हे वाण वापरावेत. बाजरी - खरीप हंगामामध्ये बाजरी पिक पेरणीसाठी पुढील वाणाची उपलब्धता करून प्यावी. •संकरीत : फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती • सुधारित : धनशक्ती मका - खरीप हंगामध्ये मका पिकाच्या पेरणीसाठी पुढील वाणांची उपलब्धता करून प्यावी. • लवकर पक्व होणारे : पुसा संकर मका-1, विवेक संकरीत मका-21, विवेक संकरीत मका-27, महाराजा • मध्यम कालावधीत पक्व होणारे : राजर्षी, बायो 9637, फुले महर्षी • उशिरा पक्क होणारे : बायो 9681, एचक्यूपीएम - 1, संगम, कुबेर • हिरव्या पायासाठी : आफ्रिकन टॉल • मधु मका : फुले मधु

आता भात शेती पुरे, शेतकऱ्याने शेतात केला नवीन प्रयोग, शून्य मशागत करून लाखो रुपये कमावले

सोयाबीन - खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी खालील वाणांची उपलब्धता करून घ्यावी.फुले किमया (केडिएस 753) फुले संगम (केडिएस 726), फूले अग्रणी (केडिएस 344), फुले कल्याणी (डिएस 228), जे.एस.-335 आंतरपिके : सोयाबीन तूर (3:1) भुईमुग - खरीप हंगामध्ये भुईमुग पेरणीसाठी पुढील वाणांची निवड करावी. एस.बी. - 11, जे.एल. - 24 (फुले प्रगती), टी.ए.जि. - 24. जे.एल. - 501, फुले उन्नती, फुले मोरणा, फुले वारणा आंतरपिके : खरीप हंगामात भुईमुग पिकात सोयाबीन, सूर्यफुल, मुग, उडीद व तूर हि आंतरपिके 6:2 या प्रमाणात घेतल्यास अधिक आर्थिक फायदा होतो. पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी भुईमुग+सोयाबीन (4:1) आणि कडेने एरंडीची लागवड (दोन ओळी) करावी. मुग - खरीप हंगामामध्ये मुग पेरणीसाठी खालील वाणांची उपलब्धता करून घ्यावी. वैभव, पी.के.व्ही, ए.के.एम-4. बी. एम. 2003-2 व बी.एम. 2002-1, उत्कर्ष, फुले चेतक, फुले सुवर्ण (पीएम-702-1) ऊस - हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. ऊस पिकामध्ये तणनियंत्रण करावे. जनावरे - जनावरांना लाळ खुरकत, फऱ्या आणि घटसर्प या रोगांच्या एकत्रित रोगप्रतिबंधक लसी टोचून घ्याच्यात. तीन महिन्यापेक्षा कमी तसेच गाभण जनावरांना लस देणे टाळावे. पावसाळा सुरु होण्यापूर्वी जनावराचे लसीकरण पूर्ण करून प्यावे. (टीप : वरील सर्व माहिती ग्रामीण कृषि मौसम सेवा ऐएमएफयु कोल्हापूर, विभागीय कृषि संशोधन केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर यांच्याकडून देण्यात आली आहे.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात