जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur : ताप आला अन् तब्येत बिघडली, परीक्षेदरम्यान कोल्हापुरातल्या मुलीसोबत घडलं भयानक

Kolhapur : ताप आला अन् तब्येत बिघडली, परीक्षेदरम्यान कोल्हापुरातल्या मुलीसोबत घडलं भयानक

Kolhapur : ताप आला अन् तब्येत बिघडली, परीक्षेदरम्यान कोल्हापुरातल्या मुलीसोबत घडलं भयानक

कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 09 मार्च : सध्या दहावी आणि बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. दरम्यान परिक्षांचे टेन्शन विद्यार्थ्यांना येत असल्याचे दिसून येत आहे. या काळात टेन्शमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. यातून विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी शिळी इडली खाल्याने विषबाधा होऊन बारावीत शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरातही विद्यार्थींनीला जीव गमवावा लागला आहे. कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा आजारपणामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. श्रावणी अरुण पाटील (वय 18) असे त्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

जाहिरात

मागच्या काही दिवसांपासून 12वीच्या परिक्षा सुरू आहेत. यामुळे काही मुला मुलींना टेन्शनमुळे ताप येत आहेत. दरम्यान कोल्हापुरातील श्रावणी बारावी इयत्तेत शिक्षण घेत होती. सध्या बारावीची परीक्षा सुरू असून उर्वरित विषयांच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना श्रावणीला अचानक ताप आला. अवघ्या काही तासात ती पूर्ण आजारी पडली अन् आई-वडिलांच्या डोळ्यांसमोरच तिने प्राण सोडले. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

फेरफटका मारण्यासाठी गच्चीवर गेली; थोड्याचवेळात इमारतीखाली आढळला महिलेचा मृतदेह, धक्कादायक घटनेनं मुंबई हादरलं

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रावणी पाटील ही शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती. सध्या तिची बोर्डाची परीक्षा सुरू असून उर्वरित पेपरचा तिचा अभ्यास सुरू होता. मात्र मागील तीन-चार दिवसांपासून तिला अचानक ताप, सर्दी आणि खोकला याचा त्रास सुरू झाला. यामुळे आई-वडिलांनी तिला तत्काळ फुलेवाडी येथीलच एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

जाहिरात

तीन ते चार दिवसाच्या उपचारानंतर श्रावणी बरी देखील झाली. यामुळे तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान तिला घरी आणल्यानंतर तिने पुन्हा अभ्यास सुरू केला. मात्र सोमवारी रात्री पुन्हा तिला ताप आल्यामुळे रात्री उशिरा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र ती बेशुद्ध झाली आणि तिचा मृत्यू झाला.

शाळेच्या बाथरूममध्ये नेत 7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीचं पीडितेच्या मैत्रिणीसोबतही क्रूर कृत्य
जाहिरात

दरम्यान, केवळ ताप आल्याने डोळ्यासमोर आपली मुलगी जग सोडून गेल्याने तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनं फुलेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: kolhapur
  • First Published :
जाहिरात
जाहिरात