जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Accident : स्पीड ब्रेकरवर बाईकचा तोल गेला अन्.. आईसमोर चिमुकलीचा अंत; कोल्हापुरातील घटना

Kolhapur Accident : स्पीड ब्रेकरवर बाईकचा तोल गेला अन्.. आईसमोर चिमुकलीचा अंत; कोल्हापुरातील घटना

आईसमोर चिमुकलीचा अंत

आईसमोर चिमुकलीचा अंत

Kolhapur Accident : कोल्हापूर शहरात आज सकाळी मन हेलावून टाकणारा अपघात घडला आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी - बायलाईन कोल्हापूर, 19 जुलै : कोल्हापूर शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चिमुकलीला घेऊन बाईकवरून शाळेला सोडायला गेलेला आईचा स्पीड ब्रेकर वरून तोल गेला. या धडपडीत चिमुकली गाडीवरून खाली पडली. त्याचवेळी मागून आलेली केएमटी बस अंगावर गेल्याने चिमुकलीचा आईसमोरच मृत्यू झाला. मन हेलवणारी ही घटना आज सकाळी सानेगुरुजी मध्ये घडली. कशी घडली घटना? संस्कृती रत्नदीप खरात राहणार फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी, असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास साने गुरूजी वसाहत येथील केएमटीच्या बसस्टॉपजवळ घडला. संस्कृतीची आई स्नेहा खरात या सकाळी दुचाकीवरून संस्कृतीला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. मात्र, स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. या धडपडीत संस्कृती गाडीवरून खाली पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या केएमटी बसचे चाक संस्कृतीच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.  दरम्यान परिसरातील नागरिकांनी तिला उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. वाचा - लोकल रखडली, ट्रॅकवरून पायी जाताना हातातून 4 महिन्याचं बाळ पाण्यात पडलं, ठाकुर्ली जवळील ह्रदयद्रावक घटना फोर्ड कॉर्नर येथील रत्नदीप खरात यांची सासरवाडी जिवबानाना पार्क आहे. त्यांची पत्नी स्नेहा बुधवारी सकाळी जिवबानाना पार्क येथील घरातून मुलीला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून निघाल्या होत्या. यावेळी बस स्टॉपवर थांबलेल्या केएमटीच्या बसला ओव्हरटेक करताना स्पीड ब्रेकरवर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआर रुग्णालयात आणण्यात आला होता. पावसाळ्यात गाडी चालवताना काळजी घ्या सध्या अनेक जिल्ह्यात पावसाने जोर पकडला आहे. नदी नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. वातावरण आल्हाददायक झाल्याने लोक मोठ्या संख्येने फिरायला बाहेर पडत आहेत. मात्र, अशावेळी वाहन चालवताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात, परिणामी गाडी घसरुन अपघात होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत धोकादायक रस्त्यांवर वाहन चालवणे टाळायला हवे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात