मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुश्रीफ यांच्या घरावरील इडीच्या छाप्यानंतर सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

मुश्रीफ यांच्या घरावरील इडीच्या छाप्यानंतर सोमय्या पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. ईडीच्या या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Ajay Deshpande

कोल्हापूर, 16 जानेवारी : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. ईडीच्या या छापेमारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. विशेष म्हणजे मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप करत किरीट सोमय्या यांनीच त्यांची ईडीकडे तक्रार केली होती. मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर आणि कागलमध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर आज सोमय्या हे कोल्हापूरमध्ये दाखल झाले आहेत. ते आज सकाळी साडेनऊ वाजता अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत.

  कोल्हापुरात पत्रकार परिषद  

हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यानंतर आज पहिल्यांदाच सोमय्या कोल्हापुरात दाखल झाले आहेत. त्यांचं कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आलं. आज सकाळी साडेनऊ वाजता सोमय्या कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते साडेअकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या काय बोलणार? पुन्हा हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : शरद पवारांना 'महाराष्ट्र केसरी'चं निमंत्रण का नाही? सुप्रिया सुळे म्हणतात..

  आरोप-प्रत्यारोप  

दरम्यान हसन मुश्रीफ यांनी ईडीचा छापा पडल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले होते. सोमय्या हे बिनबुडाचे आरोप करत आहेत असं त्यांनी म्हटलं होतं. तर मला आज कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद मिळाला अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या घरावर पडलेल्या छाप्यानंतर दिली होती. कोल्हापूर आणि कागलमध्ये मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी सोमय्यांचा जोरदार निषेध केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच सोमय्या हे कोल्हापूरला जात असल्यानं हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

First published:

Tags: Kirit Somaiya