हातकणंगले, 24 मार्च: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या हातकणंगले याठिकाणी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या (Husband commit suicide) केल्यानंतर, त्याच्या पत्नीनं देखील हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to suicide by cutting vein) केला आहे. संबंधित महिला लग्नानंतर दोन महिन्यांनी सासरी नांदायला आली होती. पण त्यांचा हा संसार दोन महिने देखील टिकला नाही. दोघांतील नात्यांचा थरारक शेवट झाला आहे. संबंधित प्रकार बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे.
विजय सुरेश शेंडगे असं आत्महत्या करणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो हातकणंगले नजीक असणाऱ्या खोत मळा परिसरात वास्तव्याला होता. मृत विजय याचा दोन वर्षांपूर्वी 24 वर्षीय तरुणी अश्विनीशी विवाह झाला होता. पण लग्न झाल्यापासून अश्विनी सासरी नांदायला गेली नव्हती. अलीकडेच दोन महिन्यांपूर्वी नातेवाईकांनी समझोता करून अश्विनीला सासरी नांदायला पाठवलं होतं. पत्नी नांदायला आल्यापासून विजय तिच्यावर अनैतिक संबंध (Immoral relationship) असल्याचा संशय घेत होता.
हेही वाचा-गोड बोलून घरी बोलावलं अन्..; तरुणीनं कुटुंबीयांसह BFला डांबून दिला भयंकर मृत्यू
यातूनच त्यांच्यात वारंवार वाद होत होता. घटनेच्या दिवशी बुधवारी देखील दोघांमध्ये याच कारणातून वाद झाला होता. या वादानंतर विजय रागाच्या भरात घरातून निघून गेला. पण रात्री दहाच्या सुमारास तो पुन्हा घरी आला. घरी आल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. या वादातून त्रासलेल्या विजयने गळफास लावून आत्महत्या केली.
हेही वाचा-पत्नीचा खून करून साडीत गुंडाळला मृतदेह अन्.., एका प्रश्नामुळे उलगडलं हत्येचं गूढ
पतीनं आत्महत्या केल्याचं समजताच घाबरलेल्या पत्नीनं देखील डाव्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच आसपासच्या नागरिकांनी 24 अश्विनीला सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. लग्नाला दोन वर्षे झाल्यानंतरही पत्नी नांदायला आली नाही. त्यानंतर पत्नी नांदायला आली पण संसार दोन महिनेही टिकला नाही. अनैतिक संबंधातून झालेल्या वादानंतर पतीची आत्महत्या आणि पत्नीनं स्वत:ची नस कापून घेतल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Kolhapur, Suicide